Pune News पुणे : पुणे शहर आणि परिसरात बेकायदेशीरपणे जागांचे तुकडे पाडून प्लॉटिंग केल्याचा प्रकार दिसत आहे. (Pune News) पण आता पुणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामासोबत बेकायदेशीरपणे जागांचे तुकडे पाडून प्लॉटिंग करणाऱ्या जागेवर कारवाईला सुरुवात केली आहे. (Pune News) त्यामुळे शेती क्षेत्रात प्लॉटिंग करणाऱ्या जागामालकांचे धाबे दणाणले आहेत. (Pune News) या कारवाईमुळे प्लॉटिंगमध्ये जागा खरेदी करून बेकायदा बांधकाम करणाऱ्यांनाही चाप बसणार आहे. (Pune News)
दोन दिवसांपूर्वी लोहगाव परिसरात महापालिकेच्या बांधकाम विभागाने शेती विकास क्षेत्रात अनधिकृतपणे जागांचे तुकडे पाहून प्लॉटिंग करणाऱ्या जागेवर जाऊन कारवाई केली. प्लॉटिंगमध्ये नागरिकांना आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेला सिमेंटचा रस्ताही जेसीबीने उखडून टाकण्यात आला.
अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई
पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर आत्तापर्यंत कारवाई केली जात होती. मात्र, आता शेती क्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे उपनगरांतील प्लॉटिंग करणाऱ्या जागामालकांचे आणि बांधकाम करणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
बेकायदा बांधकामांना बसणार चाप
अनधिकृत प्लॉटिंगमुळे बेकायदा बांधकामे उभारण्याला पोषक ठरत होतं. त्यामुळे पालिकेने आता आपला मोर्चा अनधिकृत प्लॉटिंगकडे वळवला आहे. त्यामुळे आता येत्या काळात होणाऱ्या बेकायदा बांधकामांना चाप बसणार असल्याचे म्हटले जात आहे.