Pune News : पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे नुकतेच उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर पुणेकरांसाठी मेट्रोची सेवा खुली करण्यात आली. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांसाठी खुले झाले आहेत. आता पुणेकरांना मेट्रोचे आकर्षण वाटत असून, मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काल रविवारच्या सुटीची पर्वणी साधून मेट्रो प्रवाशांनी मोठा विक्रम केला.
पुणेकरांना मेट्रो प्रवासाचे आकर्षण
रविवारी एकाच दिवसात तब्बल ९६ हजार ४९८ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करून विक्रम केला. आतापर्यंत प्रवाशांची ही सर्वोच्च संख्या आहे. (Pune News ) तर पिंपरी चिंचवड महापालिका स्टेशनवरुन १३ हजार ३९३ प्रवाशांनी प्रवास केला. सिव्हील कोर्ट स्थानकावरुन ९,९२८ तर वनाज स्थानकावरुन ९,८७२ जणांनी प्रवास केला. दोन्ही मिळून एकूण ९६ हजार ४९८ प्रवाशांनी मेट्रोची सफर केली आहे. शनिवार व रविवारी मेट्रो प्रवासात तीन टक्के सवलत दिली जाते.
पुणेकरांना मेट्रो प्रवासाचे आकर्षण वाटत असल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. (Pune News ) मेट्रोने प्रवास केल्यानंतर वाहतूक कोंडीतून सुटका होत आहे. शिवाय प्रदूषण नियंत्रण होणार असल्याने पुणेकर मेट्रोला पसंती देत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आता कॅब राइड रद्द होण्याची चिंता सोडा; पुण्यात ओलाची प्राईम प्लस सेवा
Pune News : अल्पवयीन मुलीवर घरात शिरून बलात्कार; २० वर्षीय आरोपीला अटक!