Pune News : पुणे : पुणे तिथे काय उणे, असे म्हटले जाते. आता पुणे तेथे वाहनेच नाही तर देशात सर्वाधिक हेलिकॉप्टर असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत देखील हेलिकॉप्टरचा मोठा ताफा आहे; परंतु त्याचा वापर ओएनजीसीकडून कंपनीच्या कामासाठी केला जातो. परंतु पुण्यातील ताफ्याचा वापर नागरिकांसाठी होत आहे, अशी माहिती डीजीसीएचे सदस्य नितीन वेल्डे यांनी दिले.
जाणून घ्या, कशासाठी होतो वापर?
पुणे शहराचा विस्तार चारही बाजूंनी होत आहे. मात्र, शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत नसल्यामुळे पुणेकर वैयक्तिक वाहने वापरण्यावर भर देतात. यामुळे पुण्यात वाहनांचा ताफा सर्वाधिक असल्याचे सर्वांनाच ज्ञात झाले आहे. (Pune News) मात्र, नागरिक उड्डयन महानिदेशालय म्हणजे डिजीसीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात वाहनेच नाही तर देशात सर्वाधिक हेलिकॉप्टर देखील आहेत.
पुण्यात काही खासगी हेलिकॉप्टर आहेत, तर काही कंपन्यांच्या मालकीची आहेत. या हेलिकॉप्टरचा वापर सामान्य लोकांसाठी होत आहे. जॉयराइड्साठी देखील याचा वापर केला जातो. नुकताच एकाने त्याच्या आईच्या वाढदिवसासाठी अर्ध्या तासाचे जॉयराइड घेतले. (Pune News) काही जण लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हेलिकॉप्टर वापरत आहेत. शहरात नागरी विमानतळ नसल्यामुळे लष्कराच्या लोहगाव विमानतळावरुन विमानांचे उड्डान होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशभरात २३१ हेलिकॉप्टर आहेत. त्यापैकी फक्त पुण्यात १६ हेलिकॉप्टर आहेत. १९ हेलिकॉप्टर विविध राज्य सरकारच्या मालकीची आहेत. महाराष्ट्र सरकारकडेही स्वत:चे हेलिकॉप्टर आहे. (Pune News) तसेच ८२ हेलिकॉप्टर विविध कंपन्यांच्या मालकीची आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना हेलिकॉप्टर सर्व्हिसेस देणारी फ्लाय ब्लेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ऑपरेशन्स प्रमुख संजीव पासवान म्हणाले की, आम्ही सर्वप्रथम पुण्यात आमची सेवा सुरू केली. याला चांगला प्रतिसाद आहे. (Pune News) यामुळे येत्या काही महिन्यांत पुण्याच्या ताफ्यात आणखी दोन ते तीन हेलिकॉप्टर येणार आहेत. पुणे ते मुंबई आणि मुंबई ते शिर्डी या आमच्या लोकप्रिय राइड आहेत. अनेक नागरिक आमच्या सेवा जॉयराईडसाठी वापरत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड
Pune News : मंगलमुर्तींच्या किमती यंदा २५ ते ३० टक्क्यांनी वाढणार…!