Pune News : पुणे : कार्यबाहुल्यामुळे वेळ मिळत नसल्याचे कारण देत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. बँकेच्या संचालक मंडळाने हा राजीनामा मंजूर केला आहे. मात्र, पुढील संचालक कोण असणार? यावर जोरदार चर्चा सुरू असून, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर आहे.
जोरदार चर्चा सुरू
अजित पवार यांनी १९९१ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद स्वीकारले. सलग ३२ वर्ष त्यांनी ही जबाबदारी पेलली. या ३२ वर्षांत अजित पवार चार वेळेस उपमुख्यमंत्री होते. आता पाचव्यांदा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत.(Pune News) कामाची जबाबदारी वाढल्यामुळे त्यांनी राजीनामा देत असल्याचे सांगितले. मात्र, यामागील खरे कारण पुत्र पार्थ पवार यांच्या रिलाँचिंगचे आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या जागेवर पार्थ पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक जाहीर केल्यानंतर ही निवडणूक लागणार आहे. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून पार्थ पवार संचालक होणार आहेत. (Pune News) यासाठी संचालक मंडळ मतदान करणार आहे. पदार्पणातच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पराभव झाल्यानंतर सक्रिय राजकारणातून पार्थ पवार गायब झाले होते. आता बँकेच्या माध्यमातून त्यांचे रिलाँचिंग होत असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वाघोली येथील जीएच रायसोनी कॉलेजमध्ये मानसिक ‘आरोग्य सप्ताह’ साजरा
Pune News : सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज लंपास; मध्य प्रदेशातील चोरट्यांच्या टोळीला सापळा रचून अटक