Pune News : पुणे : पुण्यातून २ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दोन संशयित दहशवाद्यांकडून महत्वाची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या लॅपटॉप, मोबाईलमध्ये ५०० जी बी डेटा आढळून आला आहे. या दोघांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये गुगल लोकेशनचे स्क्रीनशॉट सापडले आहेत, ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचा समावेश आहे. त्या दोघांकडून बॉम्ब बनवण्याचं सर्किटही सापडलं आहे. यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे.
प्रकरणातील गूढ वाढले
पुण्यात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून रोजच धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे मुंबईतील छाबड हाऊसचे फोटो सापडले होते. (Pune News) हे दहशतवादी त्यांच्याकडे सापडलेल्या ड्रोनमधून वेगेवेगळ्या जागांचे चित्रिकरण करायचे, त्या दोघांकडून बॉम्ब बनवण्याचं सर्किटही सापडलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचून आणि युट्युबचे व्हिडिओ पाहून ते प्रेरित होत होते. या प्रकरणातल्या तिसऱ्या फरार दहशतवाद्याचा शोध अजूनही सुरूच आहे.
दरम्यान, २००८ साली झालेल्या २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात चाबड हाऊस हे एक मुख्यलक्ष्य होते. दहशतवादी विरोधी पथकाने पुण्यातून मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. (Pune News) हे दहशतवादी त्यांच्याकडे सापडलेले ड्रोनने विविध जागेचे चित्रीकरण करायचे. त्या दोघांकडून बॉम्ब बनवण्याचे सर्किट देखील आढळून आले आहे.
सध्या राज्यातल्या आणि परराज्यातल्या दहशतवादविरोधी पथकाकडून पळालेल्या दहशतवाद्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणातल्या तिसऱ्या आरोपीने या दोघांना आश्रय दिला होता, त्याला रत्नागिरीमधून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीनेच दोन्ही दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे.
पुणे पोलिसांनी गस्त घालत असताना युनुस साकी आणि इम्रान खान यांना हटकलं, तेव्हा पोलिसांना या दोघांबाबत संशय आला. (Pune News) अधिक तपास केल्यानंतर हे दोघं वॉण्डेट दहशतवादी असल्याचं निष्पन्न झालं, त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने दोघांना ताब्यात घेतलं.
एटीएसला युनुस साकी आणि इम्रान खानच्या घरात सिलिंग फॅनमध्ये लपवलेल्या कागदामध्ये हाताने लिहिलेली बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया असलेला कागद सापडला आहे. (Pune News) याशिवाय एटीएसला अॅल्युमिनियम पाईप, बल्बचा फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्याही सापडल्या.