Pune News : पुणे : पीटी शिक्षकाने शारीरीक शिक्षणाचा क्लास सुरु असताना १० वर्षाच्या मुलींच्या विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार २६ ऑगस्टला उघडकीस आला आहे. याप्रकारणी शिक्षकाच्या विरोधात विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संजय देशमुख (रा. दादाची वस्ती, लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे आहे. याप्रकरणी एका मुलीच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय देशमुख हा लोहगाव येथील शाळेत शारीरीक शिक्षणाचे शिक्षक आहेत. (Pune News) तर फिर्यादी यांची १० वर्षाची मुलगी त्या शाळेत शिक्षण घेत आहे.
दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी आरोपी संजय देशमुख याने स्पोर्टस क्लासचे वेळी मैदानावर त्याचे एल्बोने मुलीच्या शरीराला वाईट उद्देशाने हात फिरविला. (Pune News) तसेच तिच्या मैत्रिणीच्या शरीराला वाईट उद्देशाने स्पर्श करुन तिला पीटी क्लास कसा वाटला, असे विचारुन अश्लिल कृत्य केले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Pune News) त्यानुसार आरोपी संजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आता पुणे रेल्वे स्थानकावर कृत्रिम प्रज्ञेची नजर..!