Pune News : पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सासवड ते नीरा मार्गावर बस चालविली. एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित घरी पोहचविण्याची जबाबदारी महिलेने शिरावर घेतली. (Proud..! For the first time in history, a woman drove S. T. Bus on the Saswad to Neera route.)
अर्चना अत्राम असे पहिली एसटी बस चालकाचे नाव आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे) या मार्गावर गुरूवारी बस चालविली. सायंकाळी साडेसहा वाजता (Pune News ) अत्राम या सासवड डेपोतून निरासाठी बस घेऊन निघाल्या. त्यांनी आज पहिल्यांदाच चालक म्हणून काम केले.
रुपाली चाकणकर यांनी ट्टिवट करून केले अभिनंदन
अत्राम यांनी बस चालविल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. याबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Pune News ) यांनी ट्टिवट करून अत्राम यांचे अभिनंदन केले.
याबाबत एसटी महामंडळाकडून काहीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. एसटी महामंडळामध्ये महिला वाहक म्हणून काम करतात. पण, अद्यापर्यंत महिला चालक एसटी महामंडळात नव्हत्या.
दरम्यान, चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची… आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. (Pune News ) सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन.’
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पालखी सोहळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल
Pune News : खळबळजनक ! पुण्यातील इंडसइंड बँकेत दिवसाढवळ्या चोरी; चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद