Pune News : पुणे : लाडक्या बाप्पाचे आगमन दीड महिन्यावर आले आहे. त्यामुळे ‘श्री’ मूर्तिकारांची लगबग वाढली. पुणे शहराला गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा आहे. शहरात सार्वजनिक व घरगुती अशा दोन्ही प्रकारांत भव्य प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो. यंदाचा गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, लाडक्या बाप्पांच्या मुर्तिकारांची लगबग वाढली आहे. मात्र, यंदा मंगलमुर्तींच्या किमती किमान २५ ते ३० टक्क्यांनी वाढतील, अशी शक्यता गणेश मूर्तीकार व्यक्त करत आहेत.
मुर्तिकारांची लगबग वाढली
लहानग्यांपासून ते थोरांपर्यंत सर्वांमध्ये गणेशोत्सवाचे आकर्षण असते. १९ सप्टेंबरला गणेशोत्सवास प्रारंभ होणार आहे. अवघ्या महिन्याभरावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. (Pune News) गणेशमूर्ती साकारण्याच्या कामांना वेग आला आहे. शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत. गेले दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवाचा जोर अधिक असणार आहे.
यंदा अधिक महिना असल्याने गणेशोत्सव महिनाभर लांबला. मात्र, गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. मूर्तीकार देखील गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मूर्ती घडवायला लागले आहेत. शाडूच्या मूर्ती बनविणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. (Pune News) त्यातच मुर्तीकारांना देखील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीऐवजी शाडूच्या मुर्ती बनवण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र, गणेश भक्तांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे जास्त आकर्षण असते. अशातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींची मागणी वाढल्यास मूर्ती कमी पडू शकतात. त्यामुळे भाववाढ होण्याची शक्यता दाट आहे.
काही मूर्तीकारांनी यंदा पुर्णपणे शाडूच्या पर्यावरणपुरक गणेश मुर्ती बनवल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती यंदा बनवल्या नाहीत. (Pune News) मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींचे आकर्षण जास्त असल्याने नागरिकांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुर्ती कमी पडल्यास भाववाढ होण्याची शक्यता जास्त आहे. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींऐवजी शाडूच्या मुर्तींकडे वळावे, असे आवाहन मूर्तीकारांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकरांसाठी गुड न्यूज! लोहगाव विमानतळावरून आता २४ तास वाहतूक…!
Pune News : पत्नी असल्याचे सांगत मैत्रिणीचे फोटो केले व्हायरल