Pune News : पुणे : गणेश मंडळांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गणेशोत्सव अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, गणेश मंडळांना पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. चार फुटांवरील गणेश मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र, चार फुंटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींसाठी शाडूची माती वापरणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, पीओपीला पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्यापही जाहीर झालेली नाहीत. (Pune News ) त्यामुळे ४ फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेते-साठवणूकदारांना आजपासून ‘एक खिडकी’ पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
जलप्रदूषणात वाढ होण्याची शक्यता
कमी किमतीत आणि वजनाला हलके असल्याने मूर्ती घडवण्यासाठी पीओपीचा सर्रास वापर केला जातो. मात्र, पीओपीचा वापर केल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत असून जल प्रदूषणाचे प्रमाणात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. (Pune News ) पोओपीच्या मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते. दरवर्षी केवळ गणेशोत्सवातच जवळपास ८ हजार टन पीओपी पाण्यात सोडला जातो. त्यामुळे एकूण उत्सवांचा अंदाज घेता नियंत्रण मंडळाने केलेले नियम पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.
उंचच उंच गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या मंडळांकडून सरकारकडे ‘पीओपी’ला पर्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. (Pune News ) मंडळाने जरी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्या, तरी या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने आणि सरसकट करता येणार नसल्याचे मूर्तिकारांचे मत आहे.
दरम्यान, गणेशोत्सव तोंडावर आला असून, महापालिकेची परवानगी मिळवण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. यंदा महापालिकेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा नवा चेहरा कोण? हे नाव आले चर्चेत…!