Pune News : पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या (ता. १) होणाऱ्या पुणे दौऱ्यामुळे पुण्यात उद्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेदरम्यान हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे बंद असलेल्या मार्गांवरुन प्रवास टाळावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच पुणेकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे प्रमुख मार्ग बंद राहणार
अलका चौक, स्वारगेट, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, पुणे विद्यापीठ चौक, टिळक रोड, शिवाजी चौक, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, सिमला ऑफीस चौक, संचेती चौक, संगमवाडी रोड, गोल्फ कल्ब चौक, विमानतळ रोड, स गो बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक आणि सेवासदन चौक हे प्रमुख मार्ग सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. (Pune News) पुणे वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. केंद्रीय पोलीस आणि पुणे पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. (Pune News) मोदी ज्या ज्या मार्गावरुन जाणार आहेत, त्या मार्गावर रंगीत तालीम घेण्यात आली आहे. तसेच पंतप्रधानांच्या ताफ्यातील कार देखील पुण्यात दाखल झाली आहे.
दरम्यान, मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मनसेकडून मागणी करण्यात आली आहे.(Pune News) त्यानुसार मनसे विद्यार्थी सेनेने शिक्षण आयुक्तांना निवदेन दिले आहे. दरम्यान, मंगळवारी पुणे शहरात होणारे सर्व कार्यक्रम हे मध्यवर्ती ठिकाणी पार पडणार आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अखेर त्यांचं ठरलं; पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थिती लावणार