Pune News : पुणे : वाढत्या वाहतूकक कोंडीमुळे पालक आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेचा विचार करुन स्कूल बसला प्राधान्या देतो. मात्र ज्यांच्या भऱवशावर प्रवास करणार त्याच वाहनांची योग्यता नसल्याचे समोर आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) ७५ टक्के वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे तब्बल २५ टक्के स्कूल बस आणि व्हॅनकडे योग्यता प्रमाणपत्र नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकप्रकारे हा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या नावाखाली त्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
शाळा सुरू होण्याआधी दर वर्षी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅनची तपासणी केली जाते. स्कूल बस अथवा व्हॅनचालकाने दर वर्षी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करणे आवश्यक असते. (Pune News ) यंदा शाळा सुरू झाल्यानंतर आरटीओला जाग आली असून, आता स्कूल बस आणि व्हॅन तपासणीसाठी मुहूर्त काढण्यात आला आहे.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजित डोंगरजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात सध्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या नोंदणीकृत सहा हजार ६०० बस आणि व्हॅन आहेत. त्यातील पाच हजार १७० स्कूल बस आणि व्हॅनला योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
२५ टक्के वाहनातून योग्यता प्रमाणपत्राविना विद्यार्थी वाहतूक
आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, अजूनही २५ टक्के वाहने योग्यता प्रमाणपत्राविना विद्यार्थी वाहतूक करीत आहेत. प्रत्यक्षात ही संख्या आणखी जास्त असण्याचा अंदाज स्कूल बसचालकांकडून वर्तवला जात आहे. (Pune News ) योग्यता प्रमाणपत्र घेणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनची संख्या केवळ ४० टक्के असावी, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांपैकी ६० टक्के वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नसल्याचा दावाही त्यांच्याकडून केला जात आहे.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनसाठी आधीच योग्यता प्रमाणपत्र मोहीम हाती घ्यायला हवी होती. त्यामुळे आता योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या बस आणि व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक सुरू आहे. – एकनाथ ढोले, सरचिटणीस, ऑल इंडिया रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना योग्यता प्रमाणपत्रासाठी दिवे घाटात न्यावे लागते. आरटीओने आळंदी रस्त्यावरील कार्यालयात ही मोहीम राबवायला हवी. हे सर्वांनाच सोईचे ठरेल.
– किरण देसाई, कार्याध्यक्ष, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मुलीला आपले नाव देण्यासाठी महिलेकडून घेतले १२ लाख; लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार
Pune News : कोंढवा-सुखसागरनगर भागात दहशत माजविणाऱ्या गुंड मंगेश माने टोळीवर मोक्का कारवाई