Pune News : पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सहकारनगर भागात गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन काडतुसे अशी शस्त्रे जप्त करण्यात आली.
दोन पिस्तूले, तीन काडतुसे जप्त
अधिक माहितीनुसार, सात्विक सचिन इंगळे (वय १९), साहिल उर्फ सच्च्या हनीफ पटेल (वय २१, दोघे रा. पर्वती), प्रथम उर्फ पेंडी सुरेश म्हस्के (वय १९, रा. दांडेकर पूल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल आणि म्हस्के हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. (Pune News) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे युनिट दोनमधील पोलीस कर्मचारी गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण गस्त घालत होते. त्यावेळी सहकारनगर परिसरात एकजण थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती सोनुने तसेच चव्हाण या कर्मचाऱ्यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. या सापळ्यात इंगळे अडकला. त्याच्याकडे एक पिस्तूल आणि काडतूस सापडले. (Pune News) चौकशीत पटेल आणि म्हस्के यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. दोघांकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदुकुमार बिडवई, उपनिरीक्षक नितीन कांबळे, मोहसीन शेख, नागनाथ राख आदींनी ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बोपदेव घाटात तरुणीवर अमानुष बलात्कार; दोन नराधमांविरूद्ध गुन्हा दाखल
Pune News : मंगळसूत्र, सोनसाखळी चोरणाऱ्या आकाश सुर्यवंशी टोळीवर ‘मोक्का’
Pune News : कारचालकाकडूनच तब्बल १ कोटी ६४ लाखांची फसवणूक; महिलेच्या मृत्यूनंतर प्रकार उघड