राजेंद्रकुमार शेळके
पुणे : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन त्वरित द्या, अशी मागण सिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेची वतीने एकात्मिक महिला बाल विकास अधिकारी निर्मला कुचिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बुधवारपर्यंत पगार जमा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
संघटनेचे जिल्हा सल्लागार लक्ष्मण जोशी म्हणाले की, मार्च, एप्रिल, मे महिन्यांचा पगार हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अजून मिळाला नाही. पगार वेळेत मिळत नसल्याने (Pune News) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.
यावेळी एकात्मिक महिला बाल विकास अधिकारी कुचिक म्हणाल्या, काही तांत्रिक अडचणी मुळे होऊ शकले नाही. मात्र, मार्च महिन्याचा पगार हा मागील पगार नियमानुसार होईल आणि एप्रिल महिन्याच्या पासून वाढीव पगार हा सेविका १०,५००आणि मदतनीस ५५०० वयानुसार वाढीव ५९०० पर्यत मिळणार आहे. (Pune News) तरी २८ तारखेपर्यंत पगार जमा होईल, असेही आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. येत्या बुधवार पर्यत पगार जमा न झाल्यास तीव्र आंदोलन इशारा देण्यात आला आहे.तसेच टी बिले, वेगवेगळे भत्ते आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांना येणाऱ्या अडचणी देखील यावेळी मांडल्या.
यावेळी अध्यक्ष शुभांगी शेटे, सचिव मनीषा भोर, जिल्हा समिती सदस्य सुप्रिया खरात, जानकी शिंदे, रुक्मिणी लांडे, जयश्री भागवत, सीमा कुटे, नंदा रघतवान, रत्ना महाकाळ, संगीता दिघे उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक! अल्पवयीन मुलीची चालत्या रेल्वेतून उडी घेत आत्महत्या
Pune News : दुधात भेसळ करणा-यांना मोक्का लावणार! : दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील