Pune News : पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोंढवा परिसरात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. या प्रकारानंतर बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात पाकिस्तान जिंदाबादचे नारे कदापी खपवून घेतले जाणार नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते झोपेच्या गोळ्या घेऊन झोपलंय का? मला लेखी पत्र द्या, मी त्यांना शोधून फासावर लटकवतो… असा थेट इशाराच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी दिला आहे.
मला लेखी पत्र द्या, मी त्यांना शोधून फासावर लटकवतो
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आयपीसी १५३ नुसार गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले. अकबर नदफ आणि तौकीर अशी आरोपींची नावे असून, ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुरक्षारक्षक आहेत. या प्रकारानंतर बिचकुले संतापले आहेत. (Pune News) दहशतवादी सापडलेला परिसर कोंढवा होता. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. यामुळे पुणे पोलीस अलर्ट झाले आहेत. पोलिसांनी या भागातून रूट मार्च काढला आहे. आरोपींमध्ये दहशत पसरावी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून कोंढवा परिसरात रूट मार्च काढण्यात आला.
याच दरम्यान पुण्यातील मुंढवा भागात एका रेस्तरामध्ये तिरंगा हातात घेऊन परफॉर्म करीत असताना युक्रेनमधील गायक उमा शांती हिने राष्ट्रध्वजाचा अवमान केला. या घटनेनंतर पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. (Pune News) या देन्ही घटनांनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. दोन्ही प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दुसऱ्याची नाव तिसऱ्याला विकून लाखोंचा गंडा; आरोपी गजाआड
Pune News : खडकीतून कर्नलचे पिस्तुल आणि २० जिवंत काडतुसांची चोरी
Pune News : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची ससून रुग्णालयाला अचानक भेट…!