Pune News : पुणे : एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देते असे सांगून, कर्ज मंजूर करण्यासाठी वेळोवेळी दोन लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतरही कर्ज मंजूर न करता, महिलेची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
कोंढव्यात महिलेवर गुन्हा दाखल
याबाबत पानमळा, सिंहगड रोड येथील ४८ वर्षांच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार उमा माणिक पाल (रा. महंमदवाडी रोड, हडपसर) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) हा प्रकार सप्टेंबर २०२० ते गुरुवार (ता. १४) या कालावधीत मोहंमदवाडी रोड, हडपसर येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी यांना एक कोटी रुपयांचे लोन करुन देते असे सांगितले. लोन मंजूर करण्यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी दोन लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर लोन मंजुर केले नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी दोन लाख रुपये परत मागितले असता एक लाख रुपये परत केले. (Pune News) मात्र, अद्यापपर्यंत उर्वरित एक लाख रुपये परत न करता आर्थिक फसवणूक केली. तक्रार अर्जाची चौकशी करुन कोंढवा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जीवे मारण्याची धमकी देत, दुचाकी घेऊन पसार; हडपसर ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल