Pune News : पुणे : ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावे नसतात. काही जणांना सरस्वती आवडते, तर कोणाला शारदा आवडते. आम्ही काय त्यांना पाहिले नाही. आमचे शिक्षण झाले ते महापुरुषांमुळे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुली करुन दिली, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी नाशिकमध्ये केले होते. या विधानानंतर वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील ब्राह्मण समाज याविरोधात आक्रमक झाला आहे.
वाद वाढण्याची शक्यता
याबाबत परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जो तरुण छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा त्यांनी केली आहे. कोणी कोणाची पूजा करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. (Pune News) परंतु समाजात तेढ निर्माण करु नये, असे परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सरस्वती आणि शारदा देवी हे आमचे देव आहेत. त्यांची पूजा केली पाहिजे. परंतु शिक्षणाची दारे आपल्याला फुले दाम्पत्य, फातिमा शेख, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात यांनी उघडी करुन दिली, असे विधान सरस्वती आणि शारदा देवीच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी केले. (Pune News) मी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालो म्हणून भूमिका बदलेन, असे काही नाही. आमची जी भूमिका आहे, ती बदलणार नाही. यात कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
मात्र, या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळणाऱ्या तिघांना 24 तासांत बेड्या; वारजे पोलिसांची कारवाई
Pune News : खंडणी उकळण्यासाठी तिने हॉटेल व्यावसायिकालाच ओढले जाळ्यात…