Pune News : पुणे : अत्यंत घाईगडबडीच्या वेळी कॅब ड्रायव्हरने अगदी अखेरच्या क्षणी राइड रद्द केल्याचा प्रकार आपल्या बाबतीत कधी ना कधी घडला असेल. या समस्येमुळे कॅब शोधणे ही मोठी समस्या ठरते. ग्राहकांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी, ओला कंपनी पुढे सरसावली आहे. पुणे आणि मुंबईतील प्रवाशांसाठी ओला कंपनीने नवीन घोषणा केली आहे. ओलाची प्राईम प्लस बंगळुरुमध्ये यशस्वी झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सुरु होत आहे. राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात ही सेवा सुरु झाली आहे.
अखंड प्रवासाची हमी
ओलाने ‘ओला प्राइम प्लस’ नावाच्या नवीन प्रीमियम सेवेची चाचणी केली आहे. २८ मे रोजी या सेवेची घोषणा करण्यात आली होती. त्याच दिवशी बंगळुरूमधील निवडक प्रवाशांसाठी ही सेवा सुरु झाली. मुंबई, पुण्याबरोबर आता ही सेवा हैद्राबादमध्ये देखील मिळणार आहे. (Pune News) यामुळे देशातील चार शहरांमध्ये प्राईम प्लस सेवा सुरु होणार आहे. अखंड प्रवासाची हमी, व्यावसायिक ड्रायव्हर्स आणि या सेवेचे इतरही अनेक फायदे असल्यामुळे बुक केलेली ट्रिप चालकाला रद्द करता येणार नाही.
प्राइम प्लसमध्ये एकदा आरक्षित केलेली राइड ड्रायव्हर रद्द करू शकत नाही. या सेवेमध्ये कंपनीने चांगले ड्रायव्हर्स देण्याचे वचन दिले आहे. प्राईम प्लस सेवेमध्ये मिळणारी वाहनेही चांगली असतील. त्यातून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
दरम्यान, या सेवेसाठी किती किंमत मोजावी लागेल, याची उत्सुकता सर्वच प्रवाशांना लागली आहे. मात्र, याबद्दल अद्याप काहीच माहिती उघड झालेली नाही. (Pune News) बंगळुरुमध्ये एका तासाचा प्रवास आणि १६ किलोमीटर अंतरासाठी ४५५ रुपये आकारले जात आहेत. मिनी कॅब या पर्यायातून राईड बुक केल्यावर त्याची किंमत ५३५ रुपये असणार आहे.
प्राइम प्लसद्वारे कॅब बुक केल्यावर त्याला ‘सर्वोत्कृष्ट ड्रायव्हर्स, नो कॅन्सलेशन किंवा ऑपरेशनल अडथळे’सह राइड मिळू शकेल. प्राइम प्लस सेवा सध्या फक्त बेंगळुरूमधील काही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. ही नवीन सेवा सर्व वापरकर्त्यांसाठी रोल आउट करण्यापूर्वी कंपनी या सेवेला बेंगळुरूमध्ये मिळणारा प्रतिसादही पाहत आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी स्वत: ट्विटद्वारे ही माहिती दिली.
दरम्यान, ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप किंवा सर्टिफाईड रेंज १२५ किलोमीटर आहे. एकवेळा चार्ज केल्यानंतर या गाड्या १२५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करतात. तसेच ८५ किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावतात. या गाड्या सहा रंगात उपबल्ध आहे. (Pune News) या स्कुटरचे तीन हजार युनिटची आतापर्यंत विक्री झाली आहे, असे कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अल्पवयीन मुलीवर घरात शिरून बलात्कार; २० वर्षीय आरोपीला अटक!
Pune News : विदेशात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष; अभियंत्याची सव्वा लाखाची फसवणूक!