Pune News : पुणे : एका निवृत्त बँक व्यवस्थापकाची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. पण कोणताही पुरावा नसल्याने या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. मात्र, तरीही पुणे पोलिसांनी आरोपींचा माग काढत गजाआड केले.
सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून शोधला आरोपी
रणजित मेला सिंग असे खून झालेल्या निवृत्त बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी सिंग यांच्याशी संबंधित सर्वांची चौकशी सुरु केली. त्यानंतरही पोलीस आरोपीपर्यंत पोहचू शकले नाही. यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या पर्यांयावर विचार सुरु केला. (Pune News) अखेरीस एक दुवा पोलिसांना सापडला आणि पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच खून केल्याची कबुली दिली.
पैशांच्या तगादाला संतापून खून
नारायण इंगळे याने रणजित मेला सिंग यांच्याकडून 30 लाख रुपये उधारीने घेतले होते. इंगळे याने त्याच्या लघुउद्योगासाठी हे कर्ज घेतले होते. परंतु अनेक दिवस झाले तरी ते पैसे परत दिले नाही. सिंग यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. यामुळे नारायण इंगळे याने सिंग यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. (Pune News) यासाठी त्याचे मित्र राजेश पवार आणि समाधान म्हस्के यांना 4 लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानुसार, सिंग यांना 19 जुलै रोजी चिंचवड येथील राहत्या घरी बोलवले. सिंग घरी आल्यानंतर त्यांना बोलत ठेवले. इंगळे आणि राजेश पवार यांनी मागून येऊन सिंग यांचा दोरीने गळा आवळला. त्यावेळी समाधान म्हस्के याने चाकूने चार ते पाच वेळा वार करून खून केला. याचा पुरावाही त्यांनी नष्ट केला.
पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबुल
पोलिसांना या प्रकरणात कोणताही पुरावा मिळत नव्हता. (Pune News) मग पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पोलिसांनी इंगळे याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : नात्यातील तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी!
Pune News : उसने पैशाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी ; निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल