Pune News : पुणे : निरोगी नागरिक हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. यामुळेच आरोग्याला सर्वाधिक महत्त्व देण्यात येणार असून, नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यासाठी लागणारी औषधे व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. लवकरच चाकण येथील रूग्णालयात डायलिसीस सेंटरचे काम सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव व शिरुर तालुक्यातील आरोग्यसेवा बळकट होणार
मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत (Pune News) विविध कामांना वित्त विभागाची मान्यता व निधी उपलब्ध करण्याबाबत बैठक झाली. या वेळी दिलीप वळसे पाटील बोलत होते.
शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाबळ, मलठण तर आंबेगाव तालुक्यातील तळेघर ग्रामीण रुग्णालयास मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. रांजणी (ता. आंबेगाव), करंदी (ता. शिरूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले जाईल. पिंपरखेड, कारेगाव व पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथे नवीन उपकेंद्र मंजूर करण्यात येईल. मंचर उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. (Pune News) खेड येथे ट्रॉमा केअर युनिट निर्माण करण्यात येणार आहे. चाकण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे व डायलिसीस सेंटर सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. निरावागज (ता. बारामती) व जरेवाडी (ता. खेड) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबत बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले.
यामुळे आंबेगाव व शिरुर तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होईल. उपजिल्हा रुग्णालये व इतर रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करण्याचे निर्देशही देण्यात आले, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव काळात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद