Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यातील सत्तासमीकरणे झपाट्याने बदलत गेली. राष्ट्रवादीचे काही आमदार अजित पवारांच्या गोटात गेले, तर काही आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला. अनेक नेते, पदाधिकाऱ्यांना नेमकी काय भूमिका घ्यावी, याबाबत संभ्रम निर्माण झाला. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नव्हती. आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातून फेसबुक लाईव्ह करत तुपे यांनी आपला पाठिंबा कोणाला, याबाबतची घोषणा केली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल
दरम्यान, आमदार चेतन तुपे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. या ठिकाणावरुन त्यांनी फेसबुक लाईव्ह केला. त्यात आपण पावसाळी अधिवेशनाला गैरहजर राहणार असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. (Pune News) प्रकृती ठीक नसल्यामुळे अधिवेनशाला जाणार नसल्याचे तुपे यांनी म्हटले आहे. याचवेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अजित पवारांच्या बंडानंतर तुपे यांनी आपली भूमिका दोन वेळा बदलली. शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहुन तुपे यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. (Pune News) मात्र, त्यानंतर अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांकडून दिली होती. त्यामुळे ते द्विधा मनस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. चेतन तुपे यांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्यास मनसे नेते वसंत मोरे यांची शरद पवार गटात एन्ट्री होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली. तसे झाल्यास तुपे यांनी २०२४ ची निवडणूक अवघड जाणार आहे.
फेसबुक लाईव्यद्वारे बोलताना चेतन तुपे म्हणाले की, आजपर्यंत अधिवेशात विविध आंदोलने करुन मी जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत लोकांचे प्रश्न मांडले आहेत. (Pune News) परंतु प्रकृती चांगली नसल्याने मी सध्या रूग्णालयात आहे. यामुळे मी अधिवेशन मिस करत आहे. लवकरच बरा होऊन अधिवेशनाला जाण्याची माझई इच्छा आहे. पुढील काळात जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दुप्पट काम करणार आहे, असे आमदार चेतन तुपे यांनी म्हटले आहे.