Pune News : पुणे : विरोधकांच्या कथित ‘इंडिया’ आघाडीच्या ट्रेनला गार्ड आणि ड्रायव्हर नसेल, तर गाडी चालणार कशी? विरोधकांचा नेता व झेंडादेखील अद्याप ठरलेला नाही. कितीही विरोधक एकवटले तरी ते मोदींच्या पुढे टिकणार नाहीत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
पुणे-नाशिक मार्गावर संतोषनगर (भाम) येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे (उत्तर) अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. (Pune News ) त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला.
भाम येथे भाजप कार्यालयाचे उद्घाटन
या वेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री संजयबाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, भाजपाच्या क्रिडा आघाडीचे प्रदेश संयोजक संदीपअप्पा भोंडवे, रवींद्र भेगडे, आशा बुचके, अतुल देशमुख, जयश्री पलांडे, शांताराम भोसले, राम गावडे यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune News ) या वेळी सरल अॅप व व्हॉट्सअॅप ग्रूप करणारे आणि क्रियाशील कार्यकर्ते यांचा सत्कार झाला. जिल्हा कार्यकारिणीत निवड झालेल्या कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षांच्या काळात केलेली कामे नागरिकांच्या समोर आहेत. (Pune News ) देशातच नव्हे तर परदेशातही भारताची व भारतीयांची मान उंचावण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सध्या नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पहाता, देशातील एकही विरोधी पक्षाचा नेता त्यांच्या आसपासही नाही. केंद्रातील सर्व पक्षीय इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्ल्युसिव्ह अलायन्स अर्थात ‘इंडिया आघाडी’ची अवस्था ही चालक नसलेल्या रेल्वेसारखी आहे. जर पंतप्रधानपदाचा नेता नसेल तर त्यांचे हे इंजिन बंद पडणार, अशी खोचक टीकाही पाटील यांनी या वेळी केली.
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रदेश उपाध्यक्ष बाळाभाऊ भेगडे म्हणाले की, मागील तीन वर्षांच्या काळात राज्यात सत्ता नसतानाही जिल्ह्यात भाजपचा पाया गणेश भेगडे यांनी रचला आहे. त्यावर नवीन जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील हे कळस बांधतील, असा विश्वास आहे. (Pune News ) मागील तीन वर्षांच्या काळात सत्ता नसतानाही पक्षाचा एकही कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही. यातच गणेश भेगडे यांचे यश सामावले आहे.
प्रास्ताविकात बुट्टे पाटील म्हणाले की, पक्षाने दिलेले जिल्हाध्यक्षपद जबाबदारीचे आहे. या संधीचा जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि भाजपची ताकद जिल्ह्यात वाढवण्यासाठी उपयोग केला जाईल. येथे सुरू झालेल्या कार्यालयामुळे पक्षाचे कार्यकर्ते जवळ येतील आणि प्रस्थापितांविरोधात लढा देतील. कार्यकर्त्यांना प्रवाहात आणण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाचा मोठा उपयोग होईल. (Pune News ) आगामी निवडणुकीत उत्तर पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, १० नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता आणायची आहे. महिला आणि युवकांची शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व महानगरपालिका जिंकायच्या असून, खासदार व आमदार निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून आणायचे आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे जिल्ह्यात एका महिन्यात चार सर्पमित्रांना सर्पदंश दोघांचा मृत्यू तर दोघे सुरक्षित..