Pune News : पुणे : रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षाच्या पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गळ्यातील १ लाख ७ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरूणाऱ्या आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी व त्याच्या एका साथीदारावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ६४ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत ६४ टोळ्यांवर कारवाई
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मंगळसूत्र चोरीची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) दरम्यान, गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी टोळी प्रमुख आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी (वय-२५, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, कात्रज, पुणे), लोकेश मुकुंदा महाजन (वय-२४, रा. गुरुकृपा अपार्टमेंट, दत्तनगर, कात्रज, पुणे मूळ गाव समर्थनगर, खेडी बुद्रुक, जळगाव) यांना अटक केली.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी आकाश सुर्यवंशी याच्यावर ३१ तर त्याचा सहकारी लोकेश महाजन याच्यावर ८ गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune News) गुन्हे करण्यासाठी सुर्यवंशी याने टोळी तयार केली. या टोळीमार्फत धाकदपटशा दाखवून, जबरदस्ती करुन, अवैध मार्गाने बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून संघटना किंवा टोळी म्हणून संघटीत गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला. कारवाई झाल्यानंतर देखील आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले.
याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी परिमंडळ- ३ चे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
या घटनेचा पुढील तपास सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कारचालकाकडूनच तब्बल १ कोटी ६४ लाखांची फसवणूक; महिलेच्या मृत्यूनंतर प्रकार उघड
Pune News : शहरातील गणेश मंडळांचे अंतर जाणून घ्या एका क्लिकवर
Pune News : पुणेकरांनी एका दिवसात फस्त केले ३० टन पेढे आणि मोदक