Pune News : पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कडक धोरण अवलंबिले आहे. पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्ता भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ४४ गुंड टोळ्यांविरुद्ध कारवाई केली आहे.
आतापर्यंत शहरातील ४४ गुंड टोळ्यांविरुद्ध कारवाई
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संघर्ष उर्फ भाव्या नितीन आडसूळ (वय २१), साहील राजू वाघमारे उर्फ खरखर सोन्या (वय २२), अतुल श्रीपाद म्हस्कर उर्फ सोनू परमार (वय २२, तिघे रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.
गेल्या महिन्यात आडसूळ आणि साथीदारांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला होता. (Pune News) याप्रकरणी आडसूळ, त्याचे साथीदार वाघमारे, म्हस्कर यांना अटक करण्यात आली होती. आडसूळ, वाघमारे, म्हस्कर यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे दाखल आहेत. त्यांनी ताडीवाला रस्ता भागात टोळी तयार करुन दहशत माजविली होती.
या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांनी तयार केला होता. (Pune News) अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आडसुळ टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चक्क झुरळांमुळे पुणे स्थानकावर दोन तास रेल्वेचा खोळंबा!