Pune News : पुणे : कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात दहशत माजविणारा गुंड ओंकैर कुडले आणि साथीदारांनी कोथरूड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात तलवार उगारुन दहशत माजविल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर पसार झालेल्या कुडले याला मावळातील पवनानगर भागातून पकडण्यात आले होते. कुडले याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.
आजवर शहरातील ४८ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडले याच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ हेमंत पाटील, उपनिरीक्षक बसवराज माळी यांनी तयार केला होता. त्यानुसार ओंकार उर्फ आबा शंकर कुडले (वय २८, रा. सागर काॅलनी, कोथरूड), अशोक उर्फ आशुतोष बाबासाहेब काजळकर (वय २५, रा. सुतारदरा, कोथरूड), अक्षय उर्फ बारक्या सुनील पवार (वय २७, रा. मातळवाडी फाटा, भूगाव), व्यंकटेश हरिदास अंकुशे (वय २७, रमाई चौक, रामनगर, वारजे), मयूर शंकर येनपूरे (वय २५, रा. मयूर काॅम्प्लेक्स, भूगाव), आकाश दीपक लोयरे (वय २३, रा. स्वप्नसिद्धी आंगण, भूगाव), ओंकार रघुनाथ साळवी (वय २४, रा.कोकरे चाळ, शास्त्रीनगर, कोथरूड), गणेश दत्तात्रय शिंदे (वय २८, रा. किकिंष्दानगर, कोथरूड) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. (Pune News) सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे तपास करत आहेत.
पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील ४८ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गृहिणींसाठी गुड न्यूज! टोमॅटो आले आवाक्यात; आवक वाढली!