Pune News : पुणे : ‘आमचा मित्र आजारी असून, तो चालू शकत नाही. त्याला उठवण्यास मदत करण्यासाठी आमच्यासोबत चला’, असे सांगून फसवणूक करत मोबाइलची चोरी करणाऱ्या किशोर उत्तम गायकवाड व त्याच्या ३ साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ६५ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. पुणे शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली आहे.
आजवर ६५ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे खडकी येथील सह्याद्री हॉस्पिटलसमोर मोबाईलवर बोलत असताना आरोपी किशोर गायकवाड व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना एक बतावणी केली. मित्र आजारी असून, तो चालू शकत नाही. त्याला मदत करा, असे सांगून फिर्यादी यांना मदत करण्यासाठी घेऊन गेले. (Pune News ) दूर नेल्यानंतर त्यांच्या खिशातील मोबाइल घेऊन, त्यांना ढकलून देऊन पळून गेले. ही घटना २ सप्टेंबर रोजी घडला होती. याप्रकरणी खकडी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता.
दरम्यान, दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी टोळी प्रमुख किशोर उत्तम गायकवाड (वय-१९, रा. कमलाबाई बहिरट चाळ, बोपोडी), आशिष उर्फ बोना संतोष सोजवळ (वय-२४, रा. सावंत नगरी जवळ, बोपोडी), जॉर्ज डॉमनिक डिसुजा (वय-१९, रा. पवळे चाळ, बोपोडी) यांना अटक केली. (Pune News ) तर अजय सुरेश गाडेकर (वय-२०, रा. बोपोडी) हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चारने तपास करुन आरोपींकडून १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. किशोर गायकवाड याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली. अवैध मार्गाने बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून संघटना किंवा टोळी म्हणून संघटीत गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला. (Pune News ) त्यांच्यावर खुन, दुखापत करणे, प्राणघातक हल्ला करणे, खंडणी मागणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत. त्यानुसार अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मार्केट यार्डाचे कामकाज अनंत चतुर्दशीनंतर सलग दोन दिवस बंद