Pune News : पुणे : देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात सिलेंडर ११०६ वर गेलाय. पेट्रोल लिटरला १०६ रूपये मोजावे लागतात. असे असताना सांप्रदायिक दंगे होत आहेत. एनडीए सरकार म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल’अशी टीका करत येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सरकार येईल, असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या नेत्या आणि प्रवक्ता विंग कमांडर अनुमा आचार्य यांनी व्यक्त केला. (Modi government means ‘no data available; Criticism of Congress leader Anuma Acharya)
निवडणुकीत काँग्रेसचे सरकार येणार
आचार्य, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस भवन येथे आयोजित ‘नऊ वर्षे ,नऊ प्रश्न’ या पुस्तकाच्या प्रकाश समारंभात त्या बोलत होत्या. गेले नऊ वर्षे मोदी सरकारच्या काळातील निर्माण झालेल्या प्रश्नावर काॅंग्रेस पक्षाकडून ‘नऊ वर्षे ,नऊ प्रश्न’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. (Pune News) नऊ वर्षांतील नउ प्रश्न उपस्थित करून त्यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी शहर काॅंग्रेसचे पदाधिकारी अभय छाजेड, उल्हासदादा पवार, कमलव्यवहारे आदी उपस्थित होते.
या सरकारने माहीती लपवली जात असल्याचा आराेप त्यांनी केला. जागतिक आराेग्य संघटनेने देशात काेराेना काळात ४८ लाख लोक मेल्याचे सांगितले. परंतू मोदी सरकार केवळ पाच लाख म्हणते. (Pune News) चीनने भारतीय जमीनीवर अतिक्रमण केले आहे. आतापर्यंत ज्या सरकारी यंत्रणांची कारवाई झाली त्यामध्ये ९५ टक्के विरोधक आहेत. तर त्यांच्याकडे जाणा-यांना वाॅशिंग मशीनमधून धुवून घेतले जाते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात जिना बांधण्यावरून झालेल्या वादातून 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या
Pune News : व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून हळद उत्पादनाचे आमिष दाखवत शेतकऱ्यांची फसवणूक