Pune News : पुणे : हडपसर परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांवर महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. या गुंडांची सरबराई करणे आता पोलिसांच्याच अंगलट आले आहे. या गुंडांना येरवडा कारागृहात नेत असताना बंदोबस्तावर असलेल्या तीन पोलिसांनी त्याला परस्पर एका उपहारगृहात नेले. दरम्यान, उपहारागृहात पोलिसांना गुंगारा देऊन गुंड पसार झाल्याचे चौकशीत उघड झाले. या चुकीच्या वर्तनाबद्दल तीन पोलिसांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिले.
पोलिसांना गुंगारा देऊन गुंड पसार
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हडपसर परिसरामध्ये दहशत माजवणारा गुंड राजेश रावसाहेब कांबळे (वय ३६, रा. काळेपडळ, हडपसर) हा बुधवारी (ता. २) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. न्यायालयातून कारागृहात नेताना तीन पोलीस कांबळे याला परस्पर एका उपाहारगृहात घेऊन गेले. तेथून त्याने पळ काढला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. (Pune News) त्यानंतर पोलीस आयुक्त रोहिदास पवार यांनी पोलीस हवालदार मुरलीधर महादू कोकणे, राजूदास रामजी चव्हाण यांच्यासह तिघांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
तिघेही पोलीस कर्मचारी कोर्ट कंपनी म्हणून पोलीस मुख्यालयात नेमणूकीला आहेत. येरवडा कारागृहातून आरोपींना घेऊन त्यांना सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला हजर करुन कामकाज संपल्यावर त्यांना पुन्हा येरवडा कारागृहात जमा करण्याच्या कर्तव्यावर तिघांची २ ऑगस्ट रोजी नेमणूक करण्यात आली होती. त्याप्रमाणे त्यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. (Pune News) त्यातील एक आरोपी राजेश रावसाहेब कांबळे याला पुढील तारीख देण्यात आली.
राजूदास चव्हाण यांनी राजेश कांबळे याला खासगी रिक्षाने घेऊन जाऊन येरवडा कारागृहात जमा करतो, असे सांगितले. त्याला इतर दोघांनी होकार दिला. त्याप्रमाणे चव्हाण हे कांबळे याला रिक्षाने घेऊन जात असताना ते त्याला उपाहारगृहात घेऊन गेले. (Pune News) त्यावेळी तो रिक्षातून उतरला व साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. कांबळे याच्याविरुद्ध खून, खुनी हल्ले आणि लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे दोन वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का ) कारवाई करण्यात आली.
दरम्यान, गुन्हेगार पळून गेल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात नाकाबंदी करून, त्याचा शोध घेतला. तरिही तो सापडला नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकर काकांची कमाल; हात दाखवून थांबवली मेट्रो; भन्नाट व्हिडिओ व्हायरल!