Pune News : पुणे : पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांवरून आंदोलन करण्याचा आदेश दिल्यानंतर शहरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आणि रांगोळी काढत आंदोलन केले. हे आंदोलन कोथरूड, सेनापती बापट रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता, मॉडेल कॉलनी, लाहोटी हॉस्टेल, कोंढवा आदींसह विविध भागांत करण्यात आले. काही ठिकाणी तोडफोडही केली. मनसेच्या या आंदोलनाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केले आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले हे स्वाभाविक आहे. मी त्याला काहीच करू शकत नाही, मात्र, नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.
लोकांचा राग मतपेटीतून उतरणार नाही, तोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाहीत
हडपसर येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे बोलत होते. पुण्यातील रस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे पडत आहेत. लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता, ते या प्रश्नावर मार्ग काढत नाहीत. जोपर्यंत लोकांचा राग मतपेटीतून उतरणार नाही, (Pune News) तोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाहीत, असे राज ठाकरे यांनी सांगितले. रस्त्याच्या प्रश्नावर आमचे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत १६ ठिकाणी आंदोलने झाली. मुंबई-गोवा रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. मुंबई-नाशिक रस्त्यावर आंदोलन होतील. त्यामुळे सरकारचे डोळे उघडतील. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करतील, असंही त्यांनी सांगितलं.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक समस्या उद्भवतात. गर्भवती स्त्रिया जात असतात, ज्येष्ठ नागरिक जात असतात. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन करतानाच काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते आक्रमकपणे रस्त्यावर उतरतील. (Pune News)ते स्वाभाविक आहे. त्याला काही करू शकत नाही, असंही ते म्हणाले. कायदा नावाची गोष्टच राज्यात अस्तित्वात नाही. यांना वाटेल तेव्हा निवडणुका होणार. यावर त्यांना कोणीही प्रश्न विचारत नाही. राज्य सरकारमधील लोक येतात तेव्हा तुम्ही विचारत का नाही? असा सवाल त्यांनी केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बेकायदा सावकारीला कंटाळून एकाची गळफास घेऊन आत्महत्या
Pune News : अजित पवार गटाकडून पुण्यात जोरदार मोर्चेबांधणी; विरोधी गटाला रोखण्यासाठी रणनिती तयार!