Pune News : पुणे : पुणे शहर काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पाश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते दाखल झाले आहेत. मात्र, बैठक सुरु होण्यापूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. या बैठकीला कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर हे उपस्थित नव्हते तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या बॅनरवर त्यांचा फोटो देखील गायब होता. बॅनर्सवरुन ही गटबाजी समोर आली आहे.
आमदार रविंद्र धंगेकर आजारी असल्यावा नाना पटोलेंचा खुलासा
काँग्रेसच्या बैठकीच्या स्थळी पुणे ग्रामीणमधील दोन्ही आमदारांचे फोटो बॅनरवर लावले आहेत. आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांचे फोटो बॅनर्सवर आहेत. (Pune News) मात्र, कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करुन विजयी झालेले आमदार रवींद्र धंगेकर यांचे फोटो याठिकाणी नाहीत. त्यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, रविंद्र धंगेकर हे आजारी आहेत. त्यामुळे बैठकीला येऊ शकले नाही. पण मीडियाला आमची जास्त काळजी असल्यामुळे ते प्रश्न विचारत आहेत. (Pune News) काँग्रेसमध्ये कुठलीही गटबाजी नाही. गटबाजी असती तर आम्ही कसबा कसा जिंकलो असतो, असे सांगत काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
या वेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, आमदार प्रणिती शिंदे, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रेल्वेत नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र देऊन तरुणांची फसवणूक
Pune News : अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची बालमित्राला धमकी; तब्बल एक कोटींची फसवणूक
Pune News : औषधपुरवठ्यासाठी ‘हाफकिन’ला ६ कोटी मोजले, पण ‘ससून’कडे औषधांचीच वानवा; अहवालात माहिती उघड