राजेंद्रकुमार शेळके
Pune News : पुणे : आणे पठारला कुकडी प्रकल्पातून उपसासिंचनाने पाणी मिळावे यासह इतर मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन जुन्नर तालुका शेतकरी संघटना व आणे पठारभाग पाणीसंघर्ष समितीच्या वतीने शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा संघटक अंबादास हांडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. (MLA Atul Benke raised a stand with the protestors to implement the Upsa irrigation scheme on Ane Plateau…)
१९९६ मध्ये कुकडी प्रकल्पाची आखणी करण्यात आली. त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील येडगाव- पिंपळगाव जोगा- माणिकडोह-वडज ही चार धरणे व आंबेगाव तालुक्यातील डिंभा तसेच चिल्हेवाडी धरणांचा समावेश होतो. (Pune News) २०१८ पर्यंत पाणी फक्त लाभक्षेत्रातील गावांनाच देण्यात आले आहे.
या प्रकल्पाच्या तिसऱ्या सु.प्र.मा.मध्ये तत्कालीन राज्य शासनाने कुकडी लाभक्षेत्रा व्यतिरिक्त नगर जिल्ह्यातील काही गावांसाठी उपसासिंचन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. (Pune News) ज्या तालुक्यात धरणं बांधली, जिथल्या शेतकर्यांच्या जमिनी धरणात गेल्या त्या भूमिपुत्रांना डावलून ७० वर्षांत पाणी २८० कि.मी.पर्यंत नेले आणि जुन्नर तालुक्याचाच भाग असणाऱ्या आणे पठारला मात्र कायमच उपेक्षित ठेवले.
हा भूमिपुत्रांवरील अन्याय उपसासिंचन योजना राबवून दूर करावा व भविष्यात आमच्यावर आंदोलनाची वेळ येवू देवू नका,आमचं हक्काचं पाणी आम्हाला द्या,अशी मागणी आंदोलकांच्या वतीने पठार विकास संस्था आणेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते यांनी केली. (Pune News) जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील आंदोलकांसमवेत बसून आणे पठारसाठी साकळाई योजनेप्रमाणे डीपीआर तयार करण्याची मागणी केली.
यावेळी भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनी आंदोलकांची भेट घेवून भ्रमणध्वनीव्दारे आंदोलकांच्या व्यथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मांडल्या. (Pune News) त्यावेळी पालकमंत्र्यांनी फोनद्वारे शेतकर्यांशी संवाद साधताना कुकडीच्या चौथ्या सु.प्र.मा त नवीन गावांचे क्षेत्र समाविष्ट करणे, तेथील सर्वेक्षण करणे,डीपीआर तयार करणे हे सर्व निर्णय धोरणात्मक असून ते कॅबिनेटच्या बैठकीतच सोडविले जाऊ शकतात असे स्पष्टपणे केले आणि २५ मे रोजी आंदोलकां समवेत बैठक लावून याबाबत ठोस निर्णय घेवू व कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी पुकारलेले ठिय्या आंदोलन स्थगित ठेवण्याची घोषणा केली.
दरम्यान, पालकमंत्र्यांसोबत बैठकीत जो निर्णय होईल त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अंबादास हांडे यांनी दिली. (Pune News) याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब दांगट,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे,जि. प. सदस्य पांडुरंग पवार,संतोष नाना खैरे,माऊली खंडागळे यांनी देखील आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
एकच मागणी,पठारावर पाणी घोषणांनी दुमदुमला परिसर
या आंदोलनात आणे पठारभाग पाणीसंघर्ष समितीच्या वतीने रखरखत्या उन्हात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ठिय्या आंदोलन करत दिलेल्या एकच मागणी, पठारला पाणी, करू या संघर्ष हक्काच्या पाण्यासाठी..! या घोषणा दुमदुमल्या. या आंदोलन मध्ये नळवणे गावच्या सरपंच अर्चना गणेश उबाळे ,आणे च्या सरपंच सौ. प्रियांकाताई दाते ,शिंदेवाडी चे सरपंच अजित शिंदे आणि पेमदरा येथील सरपंच बाळासाहेब दाते उपस्थित होते. (Pune News) त्याचप्रमाणे आणे पठारावरील सर्व नेते ,पुढारी ,लोकप्रतिनिधी आणि शेतकरी बंधु -भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक! पुण्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..
Pune News : परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाकडून आवाहन