Pune News : पुणे : कुठल्याही देशाला विकसित देशांच्या यादीत स्थान प्राप्त करायचे असेल, तर शिक्षण आणि कौशल्याचा प्रसार अत्यंत महत्वाचा आहे, असे खुद्द भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे. एमआयटी-एडीटी विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कौशल्याचे नवनवीन तंत्रज्ञान शिकवून तसेच विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना देऊन डॉ. कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहे, असे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ तथा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजीचे कुलगुरु पद्मभूषण डॉ. बी. एन. सुरेश सांगितले.
एमआयटी-एडीटी विद्यापीठात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सोमवारी (दि.7) भव्य इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला. (Pune News) या कार्यक्रमात डॉ. सुरेश बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स-एमआयटीचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आर्मामेंट अँड कॉम्बॅट इंजिनियरिंग सिस्टीमचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. डॉ. शैलेंद्र गाडे, एमआयटी-एडीटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, प्रो-व्हाइस चान्सलर डॉ. अनंत चक्रदेव, मिटकॉमच्या डायरेक्टर प्रा. डॉ. सुनीता कराड, रजिस्ट्रार महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ कम्प्युटिंगचे अधिष्ठाता रामचंद्र पुजेरी, अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व विश्व शांती प्रार्थनेने इंडक्शन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. अनंत चक्रदेव यांनी प्रास्ताविक करताना एमआयटी-एडीटीच्या अनोख्या उपक्रमांसंदर्भात सविस्तर माहिती दिली. तर डॉ. सुदर्शन सानप यांनी उपस्थितांचे आभार मानले.
गेल्या काही वर्षांमध्ये भारताने प्रगती केली
डॉ. सुरेश विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अवकाश संसोधन आणि अणुऊर्जा क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. त्याला कारण म्हणजे आमच्या देशातील संशोधकांची मेहनत. आम्ही आज विदेशात अजस्ज्ञ अशी संरक्षण सामग्री निर्यात करत आहोत. (Pune News) या संशोधन कार्याला आता एमआयटी-एडीटीच्या विद्यार्थ्यांना पुढे न्यायचे आहे. एमआयटी-एडीटीमध्ये भविष्यातील मोठे शास्त्रज्ञ व संशोधक निर्माण होतील आणि ते भारताला जगात आणखी सक्षम बनवतील’, असा मला विश्वास आहे.
स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवकांना घडवण्यासाठी एमआयटीचा प्रयत्न
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, ‘एमआयटी आपल्या विद्यार्थ्यांना बौद्धिक व मानसिकदृष्ट्या उन्नत करण्याचे काम करतच असते. मात्र, त्यासोबतच विद्यार्थ्यांचे आध्यात्मिक उन्नयनदेखील करत असते. कारण हेच आध्यात्मिक उन्नयन त्यांच्या व्यक्तिमत्वात आदर्शवादाची पायाभरणी करत असते आणि त्यातून आदर्श नागरिक व आदर्श देश तयार होत असतो. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवकांना घडवण्यासाठी एमआयटी सुरूवातीपासूनच प्रयत्न करत आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेत असताना याची पदोपदी जाण ठेवावी. भारत संपूर्ण जगाला विज्ञान व आध्यात्मिकतेचा संगम घडवून सुख, समाधान व विश्वशांतीचा संदेश देत आहे. हा संदेश आजच्या भारतीय युवकांनी जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तेच काम एमआयटी देशभरात करत आहे’.
एमआयटी-एडीटी नेहमीच युवा विद्यार्थ्यांच्या पाठीशी
डॉ. मंगेश कराड म्हणाले की, ‘आमच्या विद्यापीठात येणारा प्रत्येक विद्यार्थी हा एक स्वप्न घेऊन आलेला असतो. त्याच्या स्वप्नांना शिक्षणाचे मजबूत पंख देऊन त्याला प्रगतीच्या आकाशात भरारी घेण्यास एमआयटी-एडीटी सर्वांगाने मार्गदर्शन देत असते. पूर्वी कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न असायचे की, त्याला मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळावी. (Pune News) परंतु, गेल्या काही वर्षांत युवकांच्या महत्वाकांक्षांनी मोठी झेप घेतली आणि आज अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांचे सीईओ भारतीय तरुण बनले आहेत. हा बदल अत्यंत क्रांतिकारी असून, या बदलामध्ये एमआयटी-एडीटी नेहमीच युवा विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. एमआयटी-एडीटी आपल्या विद्यार्थ्यांना केवळ नोकरी मागवणारे बनवण्यापेक्षा नोकरी देणारे बनवण्याचे काम करते. त्यामुळेच एमआयटी-एडीटीतून शिकून गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे स्टार्टअप सुरू केले आणि अनेकांना रोजगार देण्याचे काम ते करत आहेत’.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ओला उबेर चालकाला बेदम मारहाण करून अपहरण; सांगली येथून सुटका; सहा जणांना अटक
Pune News : पुणे मेट्रो सुसाट; एकाच दिवशी ९६ हजार प्रवाशांनी राइड करून केला नवा विक्रम!
Pune News : आता कॅब राइड रद्द होण्याची चिंता सोडा; पुण्यात ओलाची प्राईम प्लस सेवा