Pune News : पुणे : अनंत चतुर्दशीनंतर सलग दोन दिवस मार्केट यार्डाचे कामकाज बंद राहणार आहे. या दिवसांत शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.
दोन दिवस शेतीमाल विक्रीस न आणण्याचे बाजारसमितीचे आवाहन
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजार, तसेच उपबाजाराचे कामकाज अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. २९) मार्केट यार्डातील भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा विभाग, फूल बाजार बंद राहणार आहे. खडकी, मोशी, मांजरी येथील उपबाजारांचे कामकाज देखील बंद राहणार आहे. (Pune News) तर शनिवारी (ता. ३०) मार्केट यार्डातील बाजार आवारास साप्ताहिक सुट्टी असणार आहे.
यादिवशी शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव राजाराम धोंडकर यांनी केले आहे. (Pune News) मार्केट यार्ड आवारातील बाजार समितीचा पेट्रोल पंप देखील दोन दिवस बंद राहणार आहे.