Pune News : पुणे : राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच दरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद विशेष कार्यकारिणी आणि विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील वारजे येथे करण्यात आले आहे. या सभेला राज्यभरातील ४५ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. (Maharashtra State Wrestling Council meeting begins in presence of Sharad Pawar; Representatives of 45 organizations in the state participated)
राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. (Pune News ) त्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली.
बैठकीत होणा-या ठरावांकडे खेळाडूंचे लक्ष
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली. त्याच दरम्यान ‘महाराष्ट्र केसरी’ ही स्पर्धा देखील घेण्यात आली. (Pune News ) या सर्व घडामोडीदरम्यान शरद पवार यांनी वारजे येथील कुस्ती संकुलात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद विशेष कार्यकारिणी आणि विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या बैठकीला राज्यभरातील जिल्हा कुस्ती संघ आणि सहयोगी असे एकूण ४५ संघांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. आता या बैठकीमध्ये नेमके कोणते ठराव केले जातात, याकडे खेळाडूंचे लक्ष लागून राहिले आहे.
Pune News : आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश; कचरावेचकांच्या कष्टाचा पहिला विजय
Pune News : पुण्यात राँग साईडने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
Pune News : सलग चौथ्यांदा न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बोरी विद्यालयाचा 100 टक्के निकाल