Pune News : पुणे : लोणीकंद-केसनंद रस्त्यावरील वेअर हाऊस फोडून २ कोटींच्या २६६ iPhones ची चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.
इस्माईल फजल शेख (वय-३५, रा. मध्य पियारपुर, तहसिल उधवा, ठाणा राधानगर, जि. साहेबगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे..
झारखंडमधून केली अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद-केसनंद रस्त्यावरील वेअर हाऊस मध्ये १७ जुलै रोजी चोरी झाली होती. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी आरोपीला पकडण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकाला अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या काही टोळ्या झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यात सक्रीय आहे. (Pune News) अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक राधानगर पोलीस ठाणे (साहेबगंज झारखंड) येथे पाठवण्यात आले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन आरोपी निष्पन्न केले. मात्र आरोपी पश्चिम बंगालमध्ये पळून गेले होते.
दरम्यान, लोणीकंद पोलीस ठाण्यातील पथक १९ ऑगस्ट रोजी पुन्हा साहेबगंज येथे पाठवण्यात आले. या पथकाने आरोपी इस्माईल शेख याला ताब्यात घेतले. (Pune News) त्याचा ट्राझिस्ट रिमांड घेऊन गुरुवारी (ता.२४) लोणीकंद पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने चार साथीदारांच्या मदतीने वरील गुन्हा केल्याची कबुली दिली.
याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे म्हणाले कि, गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल टोळीचा म्होरक्याने पश्चिम बंगाल मधील एजंट मार्फत विकल्याची माहिती दिली आहे. (Pune News) उर्वरित आरोपींचा व चोरीचा माल घेणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. लवकरच त्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांना अटक केली जाईल.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, गजानन जाधव, पोलीस अंमलदार स्वप्निल जाधव, कैलास साळुंके, अजित फरांदे, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मुजोर मोटारचालकाची पीएमपी चालकाला बेदम मारहाण
Pune News : कन्स्ट्रक्शन कंपनीची तब्बल पावणे दोन कोटींची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल