Pune News : पुणे : यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा रोहित टिळक यांनी केली. १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आल्याचे रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही यांचीही उपस्थित असणार आहे. राष्ट्रवादीमधील सत्तानाट्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येण्याची शक्यता असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.
शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का?
दरवर्षी १ ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. यंदा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. (Pune News ) शरद पवार यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे; पण शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुरस्काराची सुरुवात १९८३ पासून…
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला १ ऑगस्ट १९८३ पासून करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन.आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, (Pune News ) डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचुक, डॉ. सायरस पूनावाला यांच्यासह अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
पंतप्रधान दोन वर्षांत तिसऱ्यांदा पुणे दौऱ्यावर
पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी २०२२ मध्ये दोनवेळा पुण्यात आले होते. त्यानंतर देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मोदी पुण्यात आले होते. (Pune News ) आता पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी पुण्यात येणार आहेत. दरम्यान, २०२४ मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासंदर्भात पंतप्रधान काही बोलतील का, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
कार्यक्रमाला या मान्यवरांची असेल उपस्थिती
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे दीपक टिळक म्हणाले. (Pune News ) कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जंगली रमीचा नाद कॅब चालकाला पडला महाग; २० हजार रुपये हरल्याने आत्महत्या…!