Pune News : पुणे : राजकारणात आश्वासक चेहरे, निष्टेचे तेज दिसायचे. विकासाचा खरा चेहरा ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. कोणीही विकासाचा चेहरा म्हणून घेऊ नये. राज्यात काही जणांनी स्वाभीमान विकून वेगळा निर्णय घेतला. राज्यात नुसता कारभार’च नाही तर कारभारी चुकले आहेत. त्यासाठी राज्यात राष्ट्रवादी कॅाग्रेस, कॅाग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्ते व मतदारांनी ‘इर्जीक’ घालून ‘वाण’ बदलूया. असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी केले.
राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक आयोजीत
मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शरद सभागृहात आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम, राष्ट्रवादी युवक कॅाग्रेस चे अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रमोद सिंह गोतारणे, कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखिले, माजी उपसभापती कारभारी भोर, उद्योजक गुलाब धुमाळ, दामुआण्णा घोडे, किसन उंडे, शरद बोंबे, धोंडीभाऊ भोर, सुरेश थिटे, संजय बढेकर, अरूण ढोमे, निलेश लांघे, नानासाहेब फुलसुंदर, शहाजी डफळ, सोपान शिंदे, विठ्ठल व्यवहारे आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना शेवाळे म्हणाले की, संघटना मजबूत करणे महत्वाचे आहे. त्यातून राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे नेतृत्व महत्वाचे आहे. पुढील महिण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून बैठका घेण्यात येतील. कार्यकर्त्यांचे मनोमिलन व सुसंवाद वाढविण्याचे काम करण्यात येईल. राज्यात विचाराच राजकारण करत, नेतृत्व घडविण्याकरीता पवार साहेबांचा वेळ वाया गेला. त्यातून त्यांना मुख्यमंत्री होता आल नाही. अस तुम्ही म्हणू नये. यापुढे साहेबांविषयी कोणीही काहि बोलले तरी त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. मतदारांपेक्षा कोणी मोठे नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
देवदत्त निकम म्हणाले, “राज्यात असणारे सरकार सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे नाही. यासाठी राष्ट्रवादी कॅाग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडी तयार केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस व सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या माध्यमातून या अगोदर देखील वेगवेगळ्या विकास कामांना गती मिळाली आहे. निष्ठावंत कार्यकर्ता असूनही बाजारसमितीला तिकीट नाकारल्या नंतर ती निवडणूक मी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या निष्ठेमुळे लढवून जिंकली.
भिमाशंकर सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माद्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. माझ काय चुकल… की मला सत्तेतून बाहेर ठेवण्याचे काम करण्यात आल. हा प्रश्न माझा अनुत्तीर्ण राहिला. यापुढे जेष्ट नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनता, अधिवासी समाज व शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या व प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश यादव यांनी केले.