युनूस तांबोळी
Pune News : पुणे : दरवर्षी पावसाने ओढ द्यावी अन् आम्ही दुष्काळात शेती जळताना पहावी. राजकीय नेते, पुढाऱ्यांनी सर्व्हे करून फक्त दिलासा द्यावा. हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन केले तर राजकारण्यांनी ते हाणून पाडावे… यापुढे हे चालणार नाही. आंदोलनाची दिशा ठरवा. एकदिलाने सगळे एकत्रित येऊ. या बारा गावांच्या पाण्यासाठी राजकारणी नेते व सत्ताधाऱ्यांचे तीन तेरा वाजवू… अशा शब्दांत तीव्र नाराजीच्या भावना पाबळ (ता. शिरूर) येथे दुष्काळग्रस्त व पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
पाबळ (ता. शिरूर) येथे पाणी संघर्षासाठी १२ गावांची बैठक आयोजित केली होती. या वेळी शेतीला पाणी मिळण्यासाठी १२ गावांतील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन पाणी प्रश्नासाठी आंदोलन करण्यासाठी ठराव पास केला. हा ठराव शासन दरबारी पाठविण्यात येणार आहे. (Pune News ) या वेळी शेतीला पाणी मिळण्यासाठी पुढील दिशा ठरविण्यात आली. शांततेच्या मार्गाने आंदोलन करून डिंभा धरण, चासकमान, कळमोडी अथवा डिंभा उजव्या कालव्यातून उपसा सिंचन पद्धतीने पाणी मिळण्यासाठी आंदोलन करण्याचे ठरले.
शिरूर तालुक्यात कान्हूर मेसाई, लाखेवाडी, मोराची चिंचोली, खैरेनगर, खैरेवाडी, धामारी, पाबळ, केंदूर, मिडगुलवाडी, हिवरे, सोनेसांगवी, वरूडे ही गावे दरवर्षी दुष्काळी गावे म्हणून ओळखली जातात. या गावांना दरवर्षी कमी पावसाला सामोरे जावे लागते. पाऊसच नसल्याने शेतीसाठी पाणी नसणारी ही गावे आहेत. या भागातील राजकीय नेते उन्हाळ्यात पिण्यासाठी टॅंकर व चारा छावणी उभ्या करतात. (Pune News ) पण ही तात्पुती योजना या गावांच्या विकासाला खिळ बसवणारी ठरत आहे. पाण्याविना शेती जळून चालली असल्याने या भागातील जुन्या पिढीबरोबर नवीन पिढी दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. कायमस्वरूपी शेतीसाठी पाणी मिळावे, ही प्रमुख मागणी या भागातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी या १२ गावांत ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आले आहेत. या ग्रामसभांना नागरिक प्रतिसाद देत आहेत.
पाण्यासाठी सर्वजण एकत्र या…
शासनाला जाग येण्यासाठी आंदोलन व ग्रामसभांचे ठराव त्वरित पाठविण्यात येणार आहेत. शांततेच्या मार्गाने या आंदोलनाला सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी महिलांनी देखील पाठिंबा दिला आहे. आंबेगाव तालुक्यातील कलमोडी धरणातून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांनी शिरूरच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राजकीय नेते मंडळी आंदोलन हाणून पाडतात. (Pune News ) तरूणांना चुकीच्या दिशा दाखवतात. थिटे वाडी धरणाबाबतचा अनुभव असल्याने खंबीर साथ देणारे तरूणांनी एकत्रित या. १२ गावे, १३ गावे की १४ गावे असा संभ्रम करू नका. पाण्यासाठी ठाम असणाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हा, असा इशारा या बैठकीत ग्रामस्थांकडून देण्यात आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भावाला सत्तूरचा धाक दाखवून, गल्ल्यातील १५ हजार रुपये घेऊन पसार; एकाविरूद्ध गुन्हा दाखल
Pune News : पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी अखेर जाहीर! माजी नगरसेवकांना प्राधान्य
Pune News : दिवे घाटात टेम्पो उलटला; एका मजुराचा मृत्यू, १४ जण जखमी