तुषार सणस
Pune News : भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील दळण-वळण मोठ्या प्रमाणात आहे. रोज हजारो प्रवासी या रस्त्याने प्रवास करतात. या मध्ये दररोज पुणे येथे कामानिमित्त जाणाऱ्या प्रवासीची संख्या मोठी आहे. मात्र या महामार्गाला कुठे आणि कसा खड्डा पडला आहे. इतपत प्रवास्यांच्या तोंडपाठ झाले होते. त्यामुळे या महामार्गावरून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच हा रस्ता तयार करताना भेसळयुक्त डांबराचा वापर केला आहे. असा आरोपी स्थानिक नागरिकांनी केला आहे.
भेसळयुक्त डांबर वापरल्याचा नागरिकांना आरोप
या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांची बातमी वृत्तपत्रामध्ये वारंवार येत होती. म्हणूनच की काय महामार्ग प्राधिकरणाला उशीरा जाग आली, आणि २५ जुलै रोजी धांगवडी येथे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले. या मुळे महामार्गावरील खड्डे पाठ झालेल्या प्रवाशांना ते खड्डे दिसेनासे झाले होते. (Pune News) परंतु भर पावसामध्ये झालेले काम आणि वापरलेले खराब डांबर यामुळे आवघ्या तीन दिवसांमध्ये आर्धा बुजवलेला रस्त्यावरील खड्डा पुन्हा जैसे थे झाला आहे. यावरूनच महामार्ग प्राधिकरण कोणत्या पद्धतीने काम केले आणि केलेल्या कामाचा दर्जा समोर आला आहे.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव मुकावा लागला आहे. तर काहींना आपले अवयव गमावून कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. या रस्त्यावरील खड्डे फूट-फूट खोल असून या खड्ड्या मुळे रोज गाड्या आदळून टायर फुटून अपघात होत आहेत. रस्त्यातील खड्ड्यात आदळून रस्त्याच्या मध्येच गाडी बंद पडत आहे. (Pune News) परिणामी मागील गाडी येऊन जोरदार धडक तरी देते अथवा बचाव करताना पलटी तरी होते. यामुळे अपघातामध्ये वाढ होऊन, रस्त्यावरील वाद पोलिसांना मिटवावे लागत आहेत.
महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावरही याच प्रकारे खड्डे असल्याने वळण घेत असतानाच गाडी खड्ड्यामध्ये आदळत गाडीच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. याच प्रकारे रोज तेच तेच प्रश्न,दृश्य पाहत असणाऱ्या नागरिकांनी आम्ही टोल तरी का भरायचा. हा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, या रस्त्याची दुरवस्था झाली आहे ती महामार्ग प्रशासनाने दखल घेत ती दुरुस्त करावी, तसेच ठीक ठिकाणी पडलेले रस्ते व्यवस्थित बुजवावेत अशी विनंती महामार्गालगत गावातील ग्रामस्थ टोल नाका हटाव कृती समिती , स्थानिक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व ग्रामस्थ प्रवाशी करत आहे. (Pune News) जर वेळीच प्रशासन जागे झाले नाही तर मोठ्या आंदोलनाला महामार्ग प्रशासनाला समोर जावे लागेल.
पुणे-सातारा रस्त्यावरील काम मुळातच निकृष्ट दर्जाचे झाले असुन IRC मानका प्रमाणे झालेले नाही. गेल्या दहा वर्षात या महामार्गावर प्रत्येक पावसाळ्यात वाहनचालकांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. ठेकेदारावर देखाव्या पुरती कारवाई करण्यात येते. NHAI च्या आशीर्वादाने ठेकेदार कंपनी वाहनचालकांच्या जिवाशी खेळत आहे. भेसळयुक्त डांबर वापरल्याचा प्रकार दोन वर्षापुर्वी समितीने उघडकीस आणला होता. परंतू, कारवाई होत नाही ही खेदाची बाब आहे.
माऊली दारवटकर
(निमंत्रक-शिवापुर टोलनाका हटाव कृती समिती)
महामार्ग प्रशासन तात्पुरता विचार करत आहे. ज्या ठिकाणी पहिला खड्डा बुजवला जातो. त्याच ठिकाणी चार दिवसांतच खड्डा पडत असेल तर ते काम कोणत्या दर्जाचे आहे. हे त्यांनीच सांगावे.
कापूरहोळ या ठिकाणी खड्ड्यांमुळे एका इसमाचा जीव त्याच्या मुला समोर गेला होता. तोच प्रकार पुन्हा होण्याची वाट महामार्ग प्रशासन पाहत आहे का? वेळीच यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
रोहन बाठे
(उपसभापती- पंचायत समिती भोर)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पंतप्रधानांचा पुणे दौरा; हे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद!