Pune News : पुणे : जीवघेण्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका व्हावी आणि प्रवास अधिक सुलभ व आरामदायी व्हावा, यासाठी पुण्यात मेट्रो प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सध्या शहरात वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर मेट्रो सेवा कार्यरत आहे. या सेवेचा लाभ पुणेकर घेत आहेत. आता पुणेकरांसाठी आणखी एक खुशखबर आहे. खडकवासला ते हडपसर या मेट्रो मार्गाच्या प्रकल्प आराखड्यास महापालिकेकडून येत्या आठवडाभरात मंजुरी देण्यात येणार आहे. यामुळे मेट्रो विस्तारातील प्रमुख अडसर दूर होणार आहे.
येत्या आठवडाभरात मंजुरी देण्यात
सध्या गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिकदरम्यानच्या मार्गावर अंतिम चाचण्या सुरू आहेत. येत्या एक ऑगस्टपासून हा मार्गही नागरिकांना प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता आहे. (Pune News) दरम्यान, मेट्रो प्रकल्पाचा शहरभर विस्तार करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार खडकवासला ते हडपसर ते खराडी या विस्तारित मार्गांसह इतर मार्गांचा विस्तृत प्रकल्प आराखडाही (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. हा आराखडा महापालिकेला सादर झाला असून, त्याला मान्यता मिळणे बाकी आहे.
दरम्यान, खडकवासला ते हडपसर या मेट्रो मार्गाच्या प्रकल्प आराखड्यास राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यास या मार्गाचे भवितव्य केंद्र सरकारच्या हाती जाणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या आराखड्यास मंजुरी मिळून भूमिपूजन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. (Pune News) या मार्गावरील विस्तारित आराखड्याला मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लवकरच मान्यता दिली जाईल. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळेल, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी सांगितले.
दरम्यान, महामेट्रो आणि पीएमआरडीएच्या मेट्रो स्टेशनमध्ये सध्या सुमारे १६० मीटरचे अंतर आहे. त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाया जात आहे. वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी दोन मजले वाढवून ही दोन्ही स्टेशन जोडली जाणार आहेत. यासाठी तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (Pune News) महामेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो यासाठी निम्मा निम्मा खर्च करणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आता पुणेकरांना मिळणार पुराचा अॅलर्ट…; कशी असेल नवी यंत्रणा?