Pune News : पुणे : तलाठी भरतीसाठी राज्यभरातून हजारो होतकरू तरुण परीक्षा देत असतात. नुकतीच तलाठी भरतीसाठीची परीक्षा पुण्यातील रामटेकडी येथील परीक्षा केंद्रात पार पडली. या केंद्रात परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना येण्यास अवघा एक मिनीट उशीर झाला. यामुळे परीक्षा केंद्रात उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आला. रामटेकडी येथील सहयोग डिजिटल हब या खासगी परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला.
रामटेकडी येथील परीक्षा केंद्रावरील प्रकार
दरम्यान, तलाठी भरतीसाठीची परीक्षा सकाळी नऊ वाजता सुरू होणार असल्याने ८.४५ वाजता उमेदवारांनी येणे अपेक्षित होते. (Pune News) मात्र, त्यानंतर आलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या फाटकावरच अडविण्यात आल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी परीक्षेला दीड तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. या वेळेत परीक्षेचा अर्ज भरलेलाच उमेदवार परीक्षा देण्यासाठी आला आहे का, याची बायोमेट्रिक तपासणी करण्यात येते. (Pune News) याबाबत परीक्षेचा अर्ज भरताना आणि परीक्षेच्या प्रवेशिकेवर लेखी कल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे विहित वेळेत न आलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जात नसल्याचे स्पष्टीकरण भूमी अभिलेखकडून देण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune news : ऐन श्रावणात पुणेकर उकाड्याने हैराण; १९०१ नंतर यंदाचा ऑगस्ट सर्वाधिक उष्ण असल्याची नोंद
Pune News: शिवाजीनगर न्यायालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले