Pune News : ्पुणे : पुण्यातील सदाशिव पेठ येथे एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे पुण्याच एकच खळबळ उडाली होती. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडलं आहे.
लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांना मिळणार बक्षीस
पीडित तरुणीवर कोयत्याने हल्ला होत असताना तिला वाटविण्यासाठी गेलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोपीचा प्रतिकार केला. यानंतर आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. (Pune News ) याचे कौतुक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या दोघांचे मनभरुन कौतुक केले असून त्यांना प्रत्येकी ५१ हजारांचं बक्षीस जाहीर केले आहे.
जितेंद्र आव्हाड ट्वीट करत म्हणाले, “पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला. (Pune News ) या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. या बक्षीसातून त्यांच्या धाडसाचं मूल्य करता येणार नाही. पण त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकरांनो काळजी घ्या ! सिंहगड घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका वाढला