Pune News : पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी या पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्कार वितरण समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या वेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीत पुणे शहरातील दोन मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पुणे शहर भारतीय जनता पक्षाने दिली.
मेट्रो आणि चांदणी चौकातील पुलाचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते
पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पुणे मेट्रोच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची तयारी सुरु झाली आहे. गरवारे ते रूबी हॉल, फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय असा मेट्रोचा विस्तारीत मार्ग असून, त्याचे काम पूर्ण झाले आहे. (Pune News) मेट्रो रेल्वे सुरक्षा तपासणी देखील पूर्ण झाली आहे. आयुक्तांकडून हिरवा कंदील दिल्यानंतर या मार्गांवर सेवा देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
शहरातील चांदणी चौकात बांधण्यात आलेल्या नवीन पुलामुळे वाहतूक कोंडीवर नियंत्रण येणार आहे. यामुळे पुणेकरांसाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. हा नवीन पूल सुरु होण्याची प्रतीक्षा पुणेकरांना आहे. (Pune News) आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांची ही प्रतिक्षाही संपणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात मेट्रो अन् चांदणी चौकातील पुलाचे लोकार्पण पूर्ण होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे महापालिकेत आता तृतीयपंथी सुरक्षा रक्षक; सामाजिक जाणिवेतून उचलले क्रांतिकारी पाऊल!
Pune News : जीवे मारण्याच्या धमकीनंतर छगन भुजबळ माध्यमांशी बोलले; म्हणाले, पवार कुटुंब…