राजेंद्रकुमार शेळके
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे उद्घाटन हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू अल्ट्रामॅन दशरथ जाधव यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवून झाले.
सायकलपटूंचे जल्लोषात स्वागत
याप्रसंगी आमदार अॅड. अशोक पवार, आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगेश सातव, आयर्नमॅन रश्मी सातव, आयर्नमॅन विनोद बोरोले, रा. कॉ. पक्ष, पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेश घुले, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक सुनिल बनकर, शिवाजीराव पवार, नगरसेवक योगेश ससाणे, हडपसर रा. कॉ. अध्यक्ष शंतनू जगदाळे, रा. काँ., हडपसर कार्याध्यक्ष अमर तुपे, संदीप बधे, आदिनाथ भोईटे, (Pune News) स्मिता दातीर, सागरराजे भोसले, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम.जाधव तसेच सायकल असोसिएशनचे प्रतापराव जाधव, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य अशोक भोसले, प्राचार्य आर. व्ही. पाटील, नितीन सावळे, प्राचार्य सचिन भारद्वाज, प्राचार्य आश्विनी शेवाळे, प्राचार्य रंजना पाटील, डॉ. प्रशांत मुळे, प्रा.अनिल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.
दरम्यान, ढोल पथक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जागोजागी सायकलपटूंना जल्लोषात स्वागत करत प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (Pune News) प्रा. डॉ. शुभांगी औटी व प्रा. मंजुषा भोसले यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. प्रीतम ओव्हाळ यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गोळीबार करत तंबाखू व्यापाऱ्याची लूट; ‘आई’ नावामुळे लागला गुन्हेगाराचा छडा!
Pune News : आत्महत्येस नकार दिल्याने तरुणीचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न; स्वत:वरही चाकूने वार