Pune News : पुणे : पुण्यातील फुरसुंगी भागात चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकावर धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या केल्याच्या धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.15) रोजी मध्यरात्री घडला होता. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, हडपसर तपास पथकाने पाठलाग करत 48 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पथकाने बोरीबेल दौंड येथून पाचही आरोपींनी ताब्यात घेतले आहे.
पूर्ववैमनस्यातून केली होती हत्या
१) प्रतिक पोपट कामठे (वय २४ वर्ष रा. बेंदवाडी फुरसुंगी पुणे.), २) शुभम सुधाकर गायकवाड (वय २१ वर्ष रा. सदर), ३) आशितोष ऊर्फ सोन्या शरद पोटे (वय २१ वर्ष रा. जैननगर फुरसुंगी पुणे.), ४) स्वराज सुनील दोरगे (वय १९ वर्ष रा. बेंदवाडी फुरसुंगी पुणे.), व ५) अनिकेत ज्ञानेश्वर कटके (वय १९ वर्ष रा. बॅदवाडी फुरसुंगी पुणे.) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी शिवलिंग ज्ञानदेव पांढरे (२०) याने फिर्याद दिली आहे. वैभव विठ्ठल गायकवाड (२२, रा. वडकी) असं हत्या झालेल्याचं नाव आहे.
फिर्यादी पांढरे हा त्याचा मित्र वैभव गायकवाड याला घेऊन दुचाकीवरून फुरसुंगीतील सुंदरबन सोसायटी रस्ता परिसरातून जात होता. त्यावेळी मागून दोन दुचाकीवरून प्रतीक कामठे, शुभम गायकवाड, सोन्या पोटे, अनिकेत कटके, स्वराज दोरगे तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या रागातून वैभव याच्यावर धारदार हत्याराने वार केले. (Pune News) लाकडी दांडक्याने मारहाण करून वैभवला गंभीर जखमी केले. यातच वैभवचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले.
या घटनेनंतर हडपसर तपास पथक आरोपींच्या मागावर होते. दरम्यान, पोलीसांनी आरोपींचे शेवटे लोकेशन स्वामी चिंचोली, रावणगाव खडकी या भागात पहाटेच्या वेळी दिसले. (Pune News) त्यानंतर तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार समीर पांडुळे, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अजित मदने यांचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले.
आरोपींबाबत पुढे काहीएक उपयुक्त माहीती मिळत नसल्याने तपासपथकाने पुणे सोलापूर हायवेवरील रोडने मिळणा-या सीसीटीव्ही फुटेज आधारे तिन दिवस टेंभुर्णी, कुर्डुवाडी, माढा, वैराग या भागातील ३०० हून अधिक फुटेज तपासात आरोपींचा माग काढला. आरोपी हे वैराग ते माळवंडी पासून पुढे गेले नसल्याचे दिसून आले. त्यानंतर हडपसर तपास पथकाने वैराग इले, सुडी, माळवंडी या ग्रामिण भागात स्थानिक नागरिक, पोलीस पाटील यांचे मदतीने माहीती काढत, आरोपी यांनी माळवंडी भागत वास्तव्य करून परत ते पुण्याचे दिशेने रवाना झाले बाबत माहीती मिळवली.
तपासपथकाने आरोपींचा जाण्याचा मार्ग निश्चीत करून त्या मार्गावरिल फुटेत तपासात आरोपी हे सोलापूर पुणे हायवे ने जात असल्याबाबत उपयुक्त माहीती गोळा करून आरोपींचा पाठलाग करत पाचही आरोपींना बोरीबेल दौड येथून ताब्यात घेतले. आरोपींना हडपसर पोलीस ठाणेस घेवून येवून त्यांचेकडे तपास करता त्यांनी मयत वैभव गायकवाड याचेबरोबर ऊरूसामध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खुन केला असल्याचे सांगीतले.(Pune News) पुढील तपास प्रतापसिंह शेळके, पोलीस उप निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
ही काहवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पूर्व प्रादेशिक विभाग व विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, विश्वास डगळे सो, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अजित मदने, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, प्रशांत टोणपे, रशिद शेख, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वारज्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार, अवघ्या २४ तासात आरोपींच्या आवळल्या मुसक्या