Pune News : पुणे : जंगलात शहरे वसवली जात असल्यामुळे, जंगली जनावरे शहरांमध्ये घुसखोरी करत असल्याचे चित्र पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसत आहे. गेल्या काही वर्षांत बिबट्यासारखा जंगली प्राणी गावात शिरून, पाळीव जनावरे, प्रसंगी माणसांवर देखील हल्ले करत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे बिबट्या की माणूस हा संघर्ष तीव्र होत आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील दिवे घाटातील रहदारीच्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या एका बिबट्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ व्हायरल
दिवे घाटात रविवारी भरदिवसा हा बिबट्या रस्त्यावर बसला होता. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. (Pune News) व्हिडिओत रस्त्यावरील वाहने हळहळू जात असल्याचे दिसत आहे आणि बिबट्या थाटात रस्त्यावर बसला आहे. चारचाकी वाहने सरळ निघून जात आहेत. परंतु दुचाकी वाहनचालकांची धांदल उडत आहे. या घटनेची माहिती नागरिकांनी त्वरित वनविभागाला दिली.
बिबट्या घाटातील रस्त्यात बसल्यानंतर प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. माहिती घेतली असता, बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे तो जखमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच तो बराच वेळ रस्त्यावर बसला होता. (Pune News) याबाबत नागरिकांनी वनविभागाला कळविले.
दरम्यान, काही वेळाने बिबट्या घाटाच्या खालच्या बाजूने मस्तानी तलावाकडे निघून गेल्याचे सांगण्यात आले. ड्रोनचा वापर करून बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तो सापडला नाही. यासाठी जखमी बिबट्याचा पुन्हा शोध घेण्यात येणार आहे. (Pune News) बिबट्यावर उपचार करुन, त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सासवडचे वनविभागाचे प्रमुख व्ही. एस. चव्हाण यांनी सांगितले
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ‘रियटर’च्या कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बेमुदत उपोषणाचा इशारा
Pune News : तब्बल पाच कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त