Pune News : मांजरी खुर्द : देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगणाऱ्यास मांजरी खुर्द स्मशानभूमी परिसरात सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.
लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाची कामगिरी
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गणेश उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत होते. (Pune News) त्यावेळी पोलीस नाईक स्वप्नील जाधव व पोलीस शिपाई दत्ता गावडे यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, मांजरी खुर्द स्मशानभूमीसमोर एक व्यक्ती उभी असून, त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्टल आहे.
पोलीस शिपाई गावडे यांनी ही बातमी त्वरित तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांना फोनद्वारे दिली. जाधव यांनी ही बातमी विश्वजीत काइंगडे यांना दिली असता, त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मांजरी खुर्द स्मशानभुमी परिसरात सापळा रचून, संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले. (Pune News) त्याची झडती घेतली असता १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतूस आढळून आले.
आरोपीविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune News) नमूद गुन्ह्याचा पुढील अधिक तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब सकाटे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खडकीतील गुंड किशोर गायकवाड व साथीदारांवर ‘मोक्का’ कारवाई
Pune News : मार्केट यार्डाचे कामकाज अनंत चतुर्दशीनंतर सलग दोन दिवस बंद