Pune News : पुणे : मंदिरात मोठ्या भक्ती भावाने दर्शनासाठी जाणार असाल तर एक खबरदारी घ्यावीच लागणार आहे. आता मनात आले की लगेच मंदिरात गेलात आणि दर्शन घेतले असे होणार नाही. त्या पूर्वी तूम्ही अंगात कोणता ड्रेस परिधान केला आहे. ते पाहावे लागणार आहे. तरच मंदिरात पाय ठेवता येणार आहे.कारण याबाबत महाराष्ट्र मंदिर महासंघाने मोठी घोषणा केली आहे. (If you are going to a temple, you need this information now!..Dress code in 114 temples in Maharashtra)
महाराष्ट्रातील 114 मंदिरांमध्ये ‘ड्रेसकोड’
या घोषणेनुसार महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. (Pune News) त्यामुळे आता ड्रेसकोड लागू होणार आहे. त्यामुळे मंदिरात जाताना तुम्हाला कपड्यांच्याबाबतील सतर्क राहावे लागणार आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने 7 जून 2023 या दिवशी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील मंदिरांच्या ट्रस्टींची बैठक आयोजित केली होती. (Pune News) या बैठकीला उपस्थित सर्व मंदिरांच्या ट्रस्टींनी मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याला ठराव एकमताने संमत केला.
जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहमदनगर यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये आज मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील 18 मंदिरांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली. (Pune News) दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने मुंबईमधील श्री शीतलादेवी मंदिरात याबाबत निर्णय घेण्यात आला. अशी माहिती महासंघाने पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जीवदानी मंदिराचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, कडाव गणपती मंदिराचे विश्वस्त (कर्जत) विनायक उपाध्ये, केरलीय क्षेत्रपरिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर हे उपस्थित होते. वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार्या मंदिरांच्या नावांची घोषणा यावेळी सुनील घनवट यांनी केली.
वर्ष 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाने मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली. यामध्ये ‘जीन्स पँट’,‘टी-शर्ट’, भडक रंगांचे कपडे यांवर बंदी घालण्यात आली आहे. (Pune News) ही वस्त्रसंहिता लागू करण्यामागे जनमानसांत शासकीय प्रतिमा बिघडू नये, हा सरकारचा हेतू होता. त्याचधर्तीवर आता मंदिरातही ड्रेसकोड लागू करण्याचा विचार आहे.
देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. (Pune News) त्याप्रमाणे मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता असावी, असे सुनील घनवट यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी खडसावले; म्हणाल्या, मला संसदरत्न….
Pune News : येरवडा-कल्याणीनगर परिसरातील एलिफंट अॅन्ड को. रेस्टॉरंट अॅन्ड बारवर पोलिसांची कारवाई