Pune News : पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील एका रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झाले. त्यानंतर थेट एकनाथ शिंदे यांनाच त्यांनी थेट प्रश्न विचारला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे झाले? या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. या प्रकारानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला, आणि वाद संपुष्टात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला हस्तक्षेप
दरम्यान, याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मंत्र्यांची एक खासगी बैठक पार पडली. राज्यातील विविध प्रश्न, योजना आणि निर्णयावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. (Pune News) ही घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे, असंही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. अजितदादांनी थेट राज्याच्या प्रमुखालाच जाब विचारल्याने बैठकीला उपस्थित असलेले सर्वच मंत्री अवाक् झाले.
मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना ठाण्याच्या रुग्णालयात झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्णांची प्रकृती कशी गंभीर होती, (Pune News) शेवटच्या क्षणी रुग्णालयात किती रुग्ण आले? रुग्णालयावर येणारा ताण, आदीची माहितीही शिंदे यांनी अजितदादांना दिल्याची माहिती सूत्रांनी सांगितलं.
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वाद वाढण्याची आणि बैठकीत शाब्दिक चकमक होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर फडणवीस यांनीच मध्यस्थी केली आणि वेगळा मुद्दा चर्चेला घेत पुढील वाद टाळला. (Pune News) मात्र, अजितदादा महाविकास आघाडीत असतानाही अडचण होती आताही अडचणच, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते खासगीत देत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ढोल-ताशांच्या गजरात पुण्यात केसरी गणेशोत्सवाला प्रारंभ; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
Pune News : राज्यातील कारागृहात काम करणाऱ्या कैद्यांच्या पगारात वाढ ; सात हजार कैद्यांना होणार लाभ..
Pune News : कांद्याच्या दरात मोठी घसरण ; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी