Pune News : कामशेत (पुणे) : राज्यात पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. पावसाच्या आगमनामुळे नागरिकांमध्ये वातवारण आहे. असे असतानाच पावसाच्या जोरादार हजेरीमुळेगही त्रास सहन करावा लागात आहे.तसेच काही रस्ते बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
इंद्रायणी नदीवरील मातीचा भराव गेला वाहून
मावळातील तब्बल आठ गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. इंद्रायणी नदीवरील वडीवळे गावच्या हद्दीमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलाशेजारीच वाहतुकीसाठी मातीचा भराव टाकण्यात आला होता.(Pune News) गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे नदीपात्रात भराव टाकून तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता गुरुवारी रात्री वाहून गेल्याने परिसरातील आठ गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील बुधवडी, वडीवळे, नेसावे, खांडशी, वळख, वेल्हवळी, सांगिसे, उंबरवाडी या गावांचा त्यामध्ये समावेश आहे.
सद्य:स्थितीत या आठ गावांना कामशेत शहराशी जोडणाऱ्या पर्यायी मार्गाची अवस्था बिकट असून स्थानिकांना मुंढावरेमार्गे वळख या कच्च्या चिखलमय रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. (Pune News) या पर्यायी मार्गाची वेळीच डागडुजी होणे गरजेचे होते. मात्र, या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेने कानाडोळा केल्याने नागरिकांना सुमारे १५ ते २० किलोमीटरचा वळसा घालून उंबरवाडीमार्गे गोवित्री ते कामशेत असा प्रवास करावा लागणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दर्शनाच्या हत्येसाठी सोमवारच का निवडला? राहुल हंडोरेचा धक्कादायक खुलासा ; म्हणाला…
Pune News : धक्कादायक ! मैत्रिणीचे अर्धनग्न फोटो काढून पाठवले मित्रांना
Pune News : नात्याला काळीमा ! बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार