राजेंद्रकुमार शेळके
Pune News : पुणे : ‘नक्षत्राचं देणं’ काव्यमंचाच्या वतीने दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी “जागतिक टपाल दिन” साजरा केला जातो. महाराष्ट्रातील पोष्ट ऑफीसमध्ये जाऊन, सर्व पोष्ट कर्मचारी वर्गाला गुलाबपुष्प अथवा आपल्याजवळील पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या जातात.
‘नक्षत्राचं देणं’ काव्यमंचाचा स्तुत्य उपक्रम
भोसरी पोष्ट ऑफीसमधील सर्व कर्मचारी वर्गाचा सत्कार करताना पोष्टमास्तर पंढरीनाथ चव्हाण म्हणाले की, सामाजिक संस्थेच्यावतीने आमचा सन्मान म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे काम करत असल्याची पावती आहे. सर्व पोष्ट कर्मचारी आपली कामे जबाबदारीने करत असतात. (Pune News) या माध्यमातून पोष्टाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होते.
‘नक्षत्राचं देणं’ काव्यमंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे सत्कार करताना म्हणाले की, पोष्ट आणि काव्यमंचाचा अनेक कामानिमित्त जवळचा स्नेह आहे. नेहमीच पोष्टातील कर्मचारी वर्ग नागरिकांना पोष्टाच्या सुविधा विनम्रपणे देताना दिसतात. (Pune News) संस्थेने अनेक वर्षे पोष्ट कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्याचे कार्य चालू ठेवलेले आहे.
या वेळी सर्व कर्मचारी वर्गास गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी पोष्ट मास्तर पंढरीनाथ चव्हाण व पोष्ट कर्मचारी अशोक वाघमारे, मीना माळवे, दिलीप जाधव, साईनाथ यनगंटीवार, रोहिदास मेंगाळ, संदीप पर्तेकी, शंकर मनसरवार, उमाकांत गवळी, नितीन वाढवे, मच्छिंद्र रासकर, रसिका भांड, माधुरी मुनतेकर, अस्लाफ शेख, सुरेश बोबडे यांचा सत्कार करण्यात आला.
जुन्नर पोष्ट कर्मचारी वर्गाचा सत्कार कवी यशवंत घोडे, यवततमाळ पोष्ट कर्मचारी वर्गाचा सत्कार कविवर्य राधाबाई वाघमारे, सिंधुदुर्गातील कणकवली पोष्ट कर्मचारी वर्गाचा सत्कार उदय सर्पे, सोलापूर पोष्ट कर्मचारी वर्गाचा सत्कार सुनिल बिराजदार, मालवण आचरा येथील कर्मचारी वर्गाचा सत्कार मंदार सांबारी, दौलतराव राणे, कुडाळ येथील सत्कार कविवर्य प्रा. नरेंद्रकुमार चव्हाण, मंगळवेढा येथे कविवर्य डॉ. लक्ष्मण हेबांडे, रत्नागिरीत कविवर्या वृषाली टाकळे, बीडमध्ये कविवर्य नवनाथ कापले, चंद्रपूर येथे कविवर्य बंडोपंत बोढेकर, गोंदियामध्ये कविवर्या किरण मोरे, साताऱ्यात कविवर्य रामचंद्र पंडित, धाराशिवमध्ये कविवर्य राजगुरु कुकडे, कविवर्य डॉ. सत्येंद्र राऊत, माणगाव येथे कविवर्य रमेश कांबळे, आळंदीत कविवर्य रामदास हिंगे, मुंबई येथे डॉ.अलका नाईक, चाकणमध्ये कविवर्य प्रा. दिलीप गोरे यांनी आपल्या विभागातून पोष्ट कर्मचारी वर्गाचे सत्कार केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाध्यपदी डॉ. मुरहरी केळे यांची निवड
Pune News : उपचाराच्या बहाण्याने तरुणींना बांगलादेशातून बोलावले अन् थेट कुंटणखान्यात बसवले…
Pune News : मुंढवा, हडपसरमधील रस्त्यांच्या विकासासाठी महापालिकेची १७० कोटींची निविदा